सारा न्यूज नेटवर्क -
सुशिल फडके यांच्या "राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता" या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशजी आंबेडकर यांच्या शुभहस्ते संपन्न..
अकोला (प्रतिनिधी) :- स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व सुप्रसिद्ध लेखक सुशील फडके सोलापूर व सहलेखक रजनीकांत शिरसागर यांच्या राष्ट्र नायक डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता या पुस्तकाचे प्रकाशन बंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या शुभहस्ते अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आली असल्याची माहिती लेखक सुशील फडके सोलापूर यांनी दिली आहे. आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी बाबासाहेबांच्या इतका सक्षम व्यक्ती देशात कोणीच नसताना त्यांना डावलून इंग्रज राणीचा सेवक माऊंट बॅटन याची देशाचा पहिला राष्ट्र प्रमुख म्हणून नेमणुक केली. त्याने १) चुकीच्या संकल्पना देशात रुजविल्या, २) डॉ. बाबासाहेबांच्या देशासाठीचे मार्गदर्शन उदा. १) चीन पासून असलेल्या धोका, २) आट्रिकल कलम तरतुदी, ३) सी.ए.ए. ३७० , ४) जातीवाद इ. च्या विपरीतच कामकाज केले. यातुन देशात सामाजिक स्वास्थ, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक समस्या देशात निर्माण झाल्या. आपल्या देशा विरोधात सुरु असलेल्या इनफॉरमेशन बॉर फेअरचे उत्तर डॉ. बाबासाहेबाच्या मार्गदर्शनात आहे.
आपला देश वाचविण्या साठी डॉ. बाबासाहेबांचे मार्गदर्शनास मान्यता देऊन ते जनमनात रुजविणे व त्यांना राष्ट्रपिता म्हणुन गौरवीत करण्या साठी सदर पुस्तक पत्र रुपाने मा. मुख्य न्यायमुर्ती, सर्वोच्च न्यायालय यांना लेखक सुशिल फडके व सहलेखक रजनीकांत क्षीरसागर यांनी लिहिले असून त्यात देशाच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख या नात्याने पुढाकार घेऊन देशाच्या स्वातंत्राच्या ७५ वर्षानंतर तरी स्वतंत्र भारताचा स्वतःच्या विचार धारे वरचा म्हणजेच जनमनातील राष्ट्रपित्या च्या सेक्युल रिजम च्या मार्गदर्शना वर प्रवास सुरु झाला पाहिजे की ज्यातून सामाजिक स्वास्थ, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा आबाधित राखण्याची चेतनाच जनमनात जागृत राहिल, यासाठीच जन मानातील राष्ट्रपित्यास देशाचा राष्ट्रपिता म्हणून गौरवित करण्या साठी आपला पुढाकार आवश्यकच आहे, अशी जनभावना आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करण्याची मागणी केली आहे, यास स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार सरंक्षण संघटनेने जाहिर पाठिंबा दिलेला आहे. पुस्तकात नमुद प्रमाणे आपला देश वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे जीवितास धोका आहे. मात्र आपला देश वाचविण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न :- लेखक सुशिल फडके (सोलापूर) सहलेखक रजनीकांत क्षीरसागर
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment