सारा न्यूज नेटवर्क -
सोलापुरात सादिक शेख यांचा वाढदिवसानिमित्त जंगी सत्कार
सोलापूर (प्रतिनिधी) :- मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक यश संघर्षाचे युवा निर्भीड संपादक यांच्या वाढदिवसानिमित्त मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सादिक शेख यांचा वाढदिवस सोलापूर येथे साजरा करण्यात आला.
सादिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शाल व पुष्पहार तसेच पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर सादिक शेख यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप मानव अधिकार संरक्षण संघटना चे प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी जिल्हा अध्यक्ष चांदसाब मुजावर आरोग्य विभाग जिल्हा अध्यक्ष अकबर शेख जिल्हा महासचिव परवेज मुल्ला शहर उपाध्यक्ष अजहर बिजापुरे शहर संपर्क प्रमुख फैयाज मुल्ला साप्ताहिक यशसंघर्ष चे प्रतिनिधी फरीदोदीन खाजा इरफान मुजावर सलीम शेख मिरमोहंमद खान हलिमा खान इर्शाद शेख गौस गुंजेगाव मुर्त्यूजअली शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment