सारा न्यूज नेटवर्क -
संत रोहिदास विकास फाऊंडेशनचा तृतीय वर्धापन दिन सांगली येथे दिमाखात जल्लोषात संपन्न..
सांगली (प्रतिनिधी) :- संत रोहिदास विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती व फाउंडेशनचा तृतीय वर्धापन दिन संयुक्त विद्यमाने काल सांगली कुपवाड येथे मोठ्या आनंदात आणि दिमागदार जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ. सुरेखाताई निवृत्ती दिघे यांनी भूषविले, तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.मोहनजी वंनखडे भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हे होते.या कार्यक्रमासाठी प्रकाश डंग नगरसेवक, बिरेंद्र थोरात नगरसेवक तसेच ज्येष्ठ समाजसेवक देसाई आण्णा उपस्थित होते.
या कार्यक्रमात आपल्या हलाकीच्या परिस्थितीत डगमगून न जाता शिक्षण घेऊन चांगल्या पोस्टवर असणारे१२ माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. तसेच विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी विविध विषयांवर आपल्या समाज बांधवांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात थोडाफार फरक असला तरी पूर्वीही शिक्षण तेवढेच महत्त्वाचं होतं जितकं आता महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्या मुलांनी शिकले पाहिजे शिक्षण ही काळाची गरज आहे हे ही सांगण्यात आल. फाउंडेशनने आतापर्यंत काय उपक्रम केले कोणते कार्यक्रम राबवले याची संपूर्ण माहिती पुणे जिल्हा सचिव मा.श्री पद्मने साहेबांनी दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ सुरेखाताई निवृत्ती दिघे , मा डॉ. श्री. युवराज मोरे( साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) मा सौ रुपालीताई कारंडे (महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष) मा श्री निवृत्ती दिघे साहेब (महाराष्ट्र खजिनदा) मा श्री दत्तात्रय पवार साहेब (महाराष्ट्र प्रवक्ते) मा डॉ. सौ रजनीताई शिंदे (महाराष्ट्र बचत गट अध्यक्षा) मा श्री. लक्ष्मण काजले साहेब (मराठवाडा विभाग अध्यक्ष) मा श्री इंद्रजीत बनसोडे साहेब (मराठवाडा विभाग सचिव) मा. श्री दिनकर चव्हाण साहेब (सांगली जिल्हाध्यक्ष) मा श्री दिलीप कदम साहेब (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष )मा श्री राम कृष्ण पदमाने साहेब (पुणे जिल्हा सचिव) मा श्री प्रवीण दिघे साहेब (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष) इत्यादी अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे सांगली जिल्हाध्यक्ष मा श्री दिनकर चव्हाण साहेब तसेच महिला प्रदेशाध्यक्ष मा.सौ. रूपालीताई कारंडे व महाराष्ट्रीय प्रवक्ता मा.श्री. दत्तात्रय पवार साहेब यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री रामकृष्ण पदमाने यांनी केले,तर आभार प्रदर्शन मा श्री.भरत कांबळे साहेब यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment