Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, September 2, 2024

अमोल उंबरजे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची भेट..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

अमोल उंबरजे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची भेट.. 

सोलापूर (प्रतिनिधी) : - महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे सोलापूर दौऱ्यावर आले असता महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांच्या निवासस्थानी भेट दिली. बसावारुढ महाराज मठ येथील गोशाळेचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी मुळचे औज मंद्रूप दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असलेले व आता पुणे येथे स्थायिक असलेले व शेखर मुंदडा यांचे एकनिष्ठ तथा महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांच्या सोलापूर येथील शिवपूंड या निवासस्थानी भेट दिली. उंबरजे परिवाराच्या वतीने  शेखर मुंदडा यांचा इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. अमोल उंबरजे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळेच यावेळी विविध सामाजिक विषयावर चर्चा झाली. शेखर मुंदडा म्हणाले की अमोल उंबरजे हे सोलापूर साठी चांगले सामाजिक कार्य करत आहेत असून अजून त्यांना खूप सामाजिक काम करायचे आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी हेही सोबत होते. यावेळी अमोल उंबरजे, श्रध्दा उंबरजे, सविता उंबरजे, उपसरपंच अभिषेक उंबरजे, काशिनाथ अंबिगार, विजय जाधव, महेश कासाट, रोहित पाटील उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक -राम हुंडारे

No comments:

Post a Comment