Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, September 24, 2024

महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देण्यासाठी रोजगार निर्मितीचे आयोजन;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देण्यासाठी रोजगार निर्मितीचे आयोजन;

सोलापूरातील 200 महिलांना मिळणार  "पिंक (गुलाबी) ई-रिक्षा"

सोलापूर(प्रतिनिधी) :-  महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांचा सुरक्षित प्रवास होणे यासाठी "पिंक (गुलाबी) ई-रिक्षा" ही योजना सुरु केली आहे.

सदर योजनेनुसार सोलापूर शहरातील २०० पात्र महिलांना लाभ देण्याचे लक्ष निश्चित केले आहे. या योजनेनुसार ७० टक्के कर्ज बैंकेमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार असून राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलनार आहे व १० टक्के रक्कम लाभार्थि यांना भरावयाची आहे. पिंक ई-रिक्षा हा महिलांनीच चालवायचा आहे.

या योजनेसाठी पात्रता- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावे,अर्जदार महिलेचे वय २०-४० वर्षे दरम्यान असावे,अर्जदार महिलेचे बैंक खाते असावे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखापेक्षा जास्त नसावे.

तरी ईच्छुक पात्र महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सी.एस.नं.1608/09, प्लॉट नं.12 पहिला मजला, शोभा नगर, सात रस्ता, बिग बझारच्या पाठीमागे,सोलापूर येथे अर्जाचा नमूना व अधिक माहिती साठी संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी. यांचे मार्फत करण्यात येत आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment