Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 5, 2024

येणाऱ्या गणेशोत्सवात 1500 झाडाचे वृक्षारोपण करण्याचा निर्धार - सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार

 


सारा न्यूज नेटवर्क - 

येणाऱ्या गणेशोत्सवात 1500 झाडाचे वृक्षारोपण करण्याचा निर्धार - सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार

मंद्रुप पोलीस ठाणे, इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्कचा पुढाकार... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गणेश मंडळांना वृक्षारोपण करण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यांच्या या संकल्पनेला प्रतिसाद देत मंद्रूप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोज पवार यांनी मंद्रुप हद्दीत मधील 150 गणेश मंडळांना इको नेचर क्लबच्या माध्यमातून १५०० रोप  देण्याचा निर्णय घेतला. हा गणेशोत्सव व पर्यावरण संवर्धनाचा एक प्रयत्न असणार आहे. 

 मंद्रूप पोलीस स्टेशन इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्क यांच्या माध्यमातून सर्वत्र विविध ठिकाणी गणेश मंडळा मार्फत वृक्षारोपण करण्याचा व वृक्ष संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने आज मंद्रुप पोलीस स्टेशन येथे  गणेशोत्सव समीक्षक सह बैठक घेण्यात आली. यावेळी मंद्रुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री मनोज पवार पर्यावरण दूत व समीक्षक डॉ मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, अनिकेत पाटील, अभिषेक कोरे, ठाणे अंमलदार गुरव, सागर चव्हाण, माशाप्पा कोळी व मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

 या बैठकीत सकारात्मक पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याचा व डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणेशोत्सव काळात ७ ते10 सप्टेंबर मध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सर्व मंडळांना रोपे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंद्रुप पोलीस ठाणे येथे करण्यात येणार आहे. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment