सारा न्यूज नेटवर्क -
सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. श्री के.एन कुलकर्णी सर यांचे.....
स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..
मॉडर्न प्रशालेच्या प्रांगणात केले वृक्षारोपण..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक २०/०९/२०२४ शुक्रवार
सर्वोदय शिक्षण संस्था संचालित मॉडर्न हायस्कूल सोलापूर चे संस्थापक कै. श्री के.एन कुलकर्णी सर यांच्या.... स्मृतिदिनानिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम संस्थेचे सचिव श्री के.के कुलकर्णी सर मुख्याध्यापिका शिल्पा जोशी मॅडम पर्यवेक्षिका रागणी म्हैसकर मॅडम यांनी संस्थापक कै. श्री के.के कुलकर्णी सर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अर्पण केला व त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.
इको नेचर क्लबचे संस्थापक डॉ. मनोज देवकर सर यांनी प्रशालेस १०० विविध रोपे दिली. सदरच्या रोपांचे वृक्षारोपण प्रशालेच्या प्रांगणामध्ये इको नेचर क्लब चे संस्थापक डॉ. मनोज देवकर, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, सचिव के. के कुलकर्णी सर, मुख्याध्यापिका सौ शिल्पा जोशी मॅडम, पर्यवेक्षिका सौ रागिणी म्हैसकर मॅडम, डॉ. शिवकन्या कदरेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात.
NCC 9 महाराष्ट्र बटालियनचे श्री. कोळी सर व NCC च्या विद्यार्थी यांनीही वृक्षारोपण करून यामध्ये सहभाग नोंदवला.
मॉडर्न प्रशालेचे चित्रकलेचे कलाशिक्षक श्री देशपांडे सर यांनी उत्कृष्टरित्या कै. श्री के.एन कुलकर्णी सर यांचे सूबक असे व्यक्तीचित्र रेखाटले.
तसेच प्रशालेमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषाची स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे नियोजन सौ. विशाखा कुलकर्णी मॅडम, सौ. संध्या कुलकर्णी मॅडम व कु. मुक्ता ताठे मॅडम यांनी केले.
सदरच्या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आदरपूर्वक सहभाग नोंदवला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment