Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, September 18, 2024

विश्व परिवर्तन फाउंडेशन संचलित राष्ट्रीय महिला सक्षमीकरण समितीची बैठक संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

विश्व परिवर्तन फाउंडेशन संचलित राष्ट्रीय महिला सक्षमीकरण समितीची बैठक संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्व परिवर्तन फाउंडेशन संचलित राष्ट्रीय महिला सक्षमीकरण समितीची बैठक राष्ट्रीय महिला अध्यक्ष नसीमाताई शेतसंधी व वसुंधरा महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य मीनाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी महिला सक्षमीकरणाच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी प्रमिला तूपलवंडे यांची तर राज्य उपाध्यक्षपदी सुनिता गायकवाड व रुपाराणी चव्हाण राज्यमहिला सचिव पदी सायराबानो शेख यांची निवड करण्यात आली पुणे शहर महिला अध्यक्षपदी दिलखुश तांबोळी सोलापूर शहर महिला अध्यक्षपदी प्रणाली रासे यांची निवड करण्यात आली कायदेशीर सल्लागार म्हणून कमरूंनिसा बागवान मॅडम यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मीनाताई गायकवाड, प्रमिला तूपलवंडे व नसीमा शेतसंधी यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी लैला जमादार,समीना खान, अल्फिया शेख, यासीनबी शेख, जरिना जमादार, शाहेदा बाडेवाले,लक्ष्मी छत्रिय तुकव्वा जाधव,संघमित्रा मॅडम, अंजलिताई, शकुंतला पवार,राधा छत्रिय आदी बहुसंख्य महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीमा शेतसंधी येणे केले तर आभार प्रदर्शन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक शेखसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता इक्बाल शेख, बुरहान काझी यांनी परिश्रम घेतले या वेळी संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख सर यांचा सर्व महिलांनी मिळून सत्कार केला.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment