सारा न्यूज नेटवर्क -
सोनू सूद चॅरिटी फाऊंडेशनतर्फे सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ४० लाखाची सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सप्टेंबर २०२४ प्रसिध्द अभिनेते आणि समाजसेवी सोनू सूद यांच्या नेतृत्त्वाखाली सूद चॅरिटी फाऊंडेशनने सार्वजनिक आरोग्य, सुविधा सुधारण्याच्या आपल्या मिशन अंतर्गत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील शासकिय रूग्णालयात फाऊंडेशनने यशस्वीपणे सौरउर्जा प्रकल्प उभारला आहे. रूग्णालयाची उर्जा स्वतंत्र वाढवणे आणि वैद्यकिय सेवांसाठी सतत विज पुरवठा सुनिश्चित करणे हा उद्देश आहे.
या सौरउर्जा प्रकल्पामध्ये स्वच्छ आणि शाश्वत उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे रूग्णालयाची पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरचे अवलंबित्व कमी होईल आणि विजेच्या खर्चात लक्षणीय बचत होईल या व्यतिरिक्त हा हरित उर्जा उपक्रम पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्य सेवा समस्याचे निराकरण करण्याच्या फाऊंडेशनच्या दृष्टीकोणाची संरेखित आहे. सूद चॅरिट फाऊंडेशनचे सदस्य आणि सोनू सूद चॅरिटी क्लब सोलापूरचे संस्थापक विपुल मिरजकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सोलापूरात राबविला जात असून, तो आपल्या सोलापूर येथील सरकारी रुग्णालय व सोलापूरच्या नागरीकांसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. सूद चॅरिटी फाऊंडेशनच्या सहकार्याने असे आणखी प्रकल्प साकारण्यास विपुल मिरजकर तयार असून ज्याचा थेट फायदा समाजातील वंचित घटकांना होवू शकेल.
हा सौरउर्जा प्रकल्प रुग्णालयातील अपातकालीन वॉर्ड, ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभाग यासारख्या गंभीर क्षेत्रांना मदत करेन ज्यामुळे जीवन वाचवण्याच्या प्रक्रियेवर विज कपात होणार नाही याची खात्री होईल. याचा थेट परिणाम रूग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेवर होणार असून, वैद्यकिय सेवा अखंडीतपणे चालू शकतील. सूद चॅरिट फाऊंडेशन आरोग्य, शिक्षण आणि उपजिवीका समर्थनासाठीच्या पुढाकारांसाठी ओळखले जाते. लक्ष्यित आणि प्रभावी प्रकल्पांव्दारे समाजाची प्रगती करण्यात सक्रिय भुमिका बजावतील.
श्वासात उपयांव्दारे जीवन सुधारण्याच्या त्यांच्या प्रवासातील आणखी एक मौलाचा दगड सोलापूरच्या शासकिय रूग्णालयामध्ये सौरउर्जा प्रकल्पाची स्थापना केली जात आहे. पत्रकार परिषदेमध्ये सोनू सूद चॅरिटी क्लबचे मेंबर्स आनंद पवार, शरणप्पा फुलारी, सदानंद रापिल्ली, विशाल काळे, अनुराधा काबरा, भास्कर नडीमेटला, अमोल धडके, शुभम सब्बन हे उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment