सारा न्यूज नेटवर्क -
"लक्ष्मी बागचा राजा" सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने लक्ष्मीबाग कॉलनी,डोणगाव रोड येथे वृक्षारोपण संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- लक्ष्मी बाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या "लक्ष्मीबागचा राजा" लक्ष्मीबाग, डोणगाव रोड, सोलापूर येथे मंगळवार दि.१७/०९/२०२४ रोजी सायंकाळी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लक्ष्मी बाग परिसरात विविध प्रकारचे झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने आपटे, वढ, अशोक अशा विविध देशी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले.
दसरा हा सण लवकरच येत आहे, त्यासाठी आपटे या झाडाचे रोप लावण्यात आले. हि सर्व रोपे इको नेचर क्लब कडून देण्यात आली आहेत.
यावेळी "लक्ष्मी बागचा राजा" गणेशोत्सव मंडळा कडून पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, काशिनाथ भतगुणकी सर, संपादक राम हुंडारे, डॉ प्रशांत राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
मा. डॉ.मनोज देवकर - इको नेचर क्लब,
मा. काशिनाथ भतगुणकी - ड्रीम आय ए एस कोचिंग सेंटर,
मा. राम हुंडारे - (संपादक) सारा न्यूज नेटवर्क
मा. डॉ प्रशांत राठोड - गव्हर्न्मेंट फॉरेन्सिक लॅब
मा. शशिकांत व्हनमाने - संस्थापक अध्यक्ष
मा. अभिमान राऊत - संस्थापक उपाध्यक्ष
मा. चेतन पवार - खजिनदार
मा.राजू गायकवाड - सचिव
मा.मंगेश भालशंकर - सहसचिव तसेच
लहान कार्यकर्ते - रोहित व्हनमाने, राज व्हनमाने , राम क्षिरसागर, कृष्णा क्षिरसागर,
सदस्य - रमेश क्षिरसागर, गोपाल हडपद, आनंद हडपद, सतिश शिंदे, स्वामी काका, आमले काका, वेदसुमन भोसले,आनंद शुकुलवार, अप्पा गायकवाड, साठे, भारत मामा या मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व रोपे गणपती मंदिराजवळील परीसरात लावण्यात आली. सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment