सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगरपालिके कडून पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर व वृक्षप्रेमी राम हुंडारे यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका आयोजित महाराष्ट्रातील पहिले वसुंधरा संमेलन 2024 सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात २६ व २७ सप्टेंबर रोजी साजरे करण्यात आले.
पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर व वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी इकोनेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. इको नेचर क्लब संस्था ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे. या संघटनेमार्फत अनेक औषधी वनस्पती, ऑक्सिजन निर्माण करणारे, फळे व फुले देणारी झाडे असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम ही या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. इको नेचर क्लब संस्था मागेल त्याला झाड तेही मोफत हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवत आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, संघटना, मंडळ व अनेक गृहनिर्माण सोसायट्या कडून झाडाचे रोपाची मागणी होते. इकोनेचर क्लब मार्फत त्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते व वृक्ष संवर्धनासाठी जबाबदारी घेतात . तसेच या वसुंधरा संमेलन 2024 मध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. यांच्या या सेवा कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन तथा मनपा आयुक्त शितलताई तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली समवेत उपायुक्त तैमुर मुलाणी, वसुंधरा अभियानाचे अधिकारी व सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील यांच्या हस्ते डॉ मनोज देवकर व राम हुंडारे यांचा सन्मानपत्र व वसुंधरा अभियानाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे व सहाय्यक पर्यावरणाधिकारी स्वप्निल सोलंकर, उद्यान अधीक्षक,सर्व महाराष्ट्रातील पर्यावरण तज्ञ, पर्यावरण प्रेमी, NGO संस्था, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा व वसुंधरा संमेलन पार पडले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment