Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, September 11, 2024

सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत मंद्रूप पोलीस ठाणे आयोजित रक्तदान, गणराया पारितोषिक वितरण आणि वृक्षारोपण उपक्रम यशस्वीपणे संपन्न...


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत मंद्रूप पोलीस ठाणे आयोजित रक्तदान, गणराया पारितोषिक वितरण आणि वृक्षारोपण उपक्रम यशस्वीपणे संपन्न...

सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. १०/०९/२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस यांचे संकल्पनेतून मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, गणराया पारितोषिक वितरण, वृक्षारोपण आणि गणेश मंडळांना वृक्षवाटप या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण आणि समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले. 

यावेळी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, यांनी आपले मनोगतातून संदेश दिला की,



 

पोलीस ठाणे हद्दीत महिला सुरक्षा तसेच शाळेतील आkणि कॉलेज मधील मुली यांची सुरक्षितता व जागृता निर्माण व्हावी. यामुळे शाळा कॉलेज मध्ये पोलीस काका, पोलीस दिदी कार्यक्रम राबविण्याबाबत तसेच तक्रारपेटी ठेवण्याबाबत संदेश दिला. तसेच गणेशोत्सव काळात पर्यावरण पुरक व सामाजहित साध्य होईल अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवावे. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील शेती विषयी तक्रारी बाबत बांधावर जावून वाद विवाद मिटवावे तसेच शेतकऱ्यांनी निसर्गाचे समतोल राखण्याकरिता आपल्याबांधावर व परिसरात मोठ्या प्रमाणात फळ झाडे व वृक्षारोपण करावे. असे मार्गदर्शन केले.





सन २०२३ मधील गणेशोत्सव पार पाडताना समाजाहिताचे कार्यक्रम राबविणारे गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच गणेश मंडळांना वृक्षारोपण करणेकरिता १५०० विविध प्रकारची झाडे वाटप करण्यात आले. 


समाजातील गरजू रूग्णांसाठी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सदर वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्राम सुरक्षा दल सदस्य, पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम पंचायत सदस्य, पत्रकार बंधू, पोलीस पाटील व पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी रक्तदान केले, रक्तदान कार्यक्रमास उत्पूर्स प्रतिसाद देवून विक्रमी १८२ रक्तदात्यानी रक्तदान केले, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर तसेच सिध्देश्वर रक्तपेढी उपस्थित होते.

मा. श्री. संकेत देवळेकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण यांनी आपल्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्याबाबतचे महत्त्व सांगितले तसेच गणेशोत्सव २०२३ मधील सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास मा. श्री. अतुल कुलकणी सो, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. संकेत देवळेकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. जितेंद्र मोरे सो, नायब तहसिलदार, मंद्रुप, ग्रामपंचायत सरपंच, पत्रकार बंधू, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, रक्तदाते, श्री. गणेश मंडळाचे पदाधिकारी, परीक्षक टिम, पर्यावरण दुत श्री. डॉ. मनोज देवकर, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, रक्तपेढी, प्रमुख डॉ. ऐश्वर्या मुंढे, डॉ. माधुरी जैन त्यांचे पथकातील १२ व्यक्ती, सिध्देश्वर ब्लड सेंटर, सोलापूर  प्रमुख डॉ. हरीशचंद्र गलीचाल त्यांचे पथकातील १० व्यक्ती व पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते.


सोलापूर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना रोपे वाटप करणार. 

इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून 1500 झाडाचे रोपे देण्यात आली होती. त्यासाठी पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, वृक्षप्रेमी माशाप्पा कोळी यांनी सहकार्य केले. 

यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, वृक्षप्रेमी माशाप्पा कोळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी उपस्थितीत यांना वृक्षांचे महत्त्व आयुर्वेदाचा महत्त्व तसेच आपले निसर्गाशी नाते कसे जोडले गेले या संदर्भात निसर्गाची जोपासना कशी करावी याबद्दल माहिती दिली आपल्या संवादातून पर्यावरण संवर्धन विषयी मार्गदर्शन केले. 


श्री. मनोज पवार, पोलीस अधिकारी, मंडुप पोलीस ठाणे यांनी आपल्या आभार प्रदर्शनात मंद्रुप पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या अथक परिश्रमामुळे सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे सांगितले. तसेच सरपंच, पत्रकार बंधू, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, रक्तदाते, श्री, गणेश मंडळाचे पदाधिकारी, परीक्षक टिम, इको नेचर क्लब व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, रक्तपेढी, सिध्देश्वर ब्लड सेंटर तसेच उपस्थित नागरिक यांचे आभार मानले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment