सारा न्यूज नेटवर्क -
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा;
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या हयुमॅनिटेरियन प्रकल्पाची पूर्वतयारी सुरू...
हयुमॅनीटेरीयन प्रकल्प मिनिमम इनिशिअल पॅकेज ऑफ सव्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राइटस २०२४…
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि.१३-फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना १९४९ साली झाली. ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी स्वयंसेवी, अराजकीय, अशासकीय व नफ्या-तोटयाचा विचार न करता आरोग्यविषयक, कुटुंबनियोजन विषयक, पुनरुत्पादक सेवा पुरविणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना पद्मविभूषण आवाबाई वाडिया व धन्वंती रामाराव यांच्या पुढाकारातून मुंबईत झाली. संस्थेचे मुख्य कार्यालय बजाज भवन, नरीमन पॉइंट, मुंबई येथे आहे.
फॅमिली प्लॅनिग भारताच्या १८ हून अधिक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर लक्ष केंद्रित करते, अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवते, जेथे लोकसंख्या जास्त आहे साक्षरतेने लिंगविषमता जास्त आहे. त्यात बिहार, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मिर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, नागालैंड, ओडिसा, पंजाब, राजस्थान, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली यांचा यात समावेश आहे. संस्थेच्या भारतामध्ये ४० शाखा व ५ विशेष प्रकल्प सुरु आहेत.
देशाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे सन १९५२ मध्ये कुटुंबनियोजनाचा प्रस्ताव मांडण्यात एफ.पी.ए.इंडियाचा मोठा वाटा होता. १९५२ मध्ये केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण किया कुटुंबनियोजन हे अधिकृत धोरण म्हणून स्वीकारले. हे स्वीकारण्यास फॅमिली प्लॅनिंग या संस्थेने भाग पाडले. अशाप्रकारे कुटुंबनियोजन कार्यक्रम असणारा भारत जगातील पहिला देश बनला. १९६० च्या दशकात संस्थेच्यावतीने लोकसंख्या शिक्षण, १९७० च्या दशकात युवक वर्गाला सर्वकष लैंगिकता शिक्षण, १९८० च्या दशकात वस्तीपातळीवरील लोकांना प्रोत्साहनपर कार्यक्रम, समुदाय एकत्रीकरण याविषयावर कार्य, १९९० च्या दशकात प्रजनन आरोग्य व कुटुंबकल्याण या सेवा सर्वसामान्यांचे अधिकार आहेत याविषयी जनजागृती कार्यक्रम, २००० च्या दशकात किशोरवयीन मुला-मुलींसाठी युथ फ्रेंडली क्लिनीकच्या माध्यमातून आरोग्याच्या सेवा व एच.आय.व्ही.एड्स सह जीवन जगणाऱ्यांना प्रजनन व आरोग्याच्या सेवा देण्याचे कार्य केले. २०१० पासून गर्भाशयाचा व स्तनाचा कॅन्सर याविषयी जनजागृती व सेवा देण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.
फॅमिली प्लॅनिंग कार्पोरेटस्, व्यवसाय आणि द्विपक्षीय देणगीदारांसोबत आरोग्यसेचा आणि माहिती वितरीत करण्यासाठी, क्षमता निर्माण करण्यासाठी आणि समुदायाच्या विकासाला आणि कल्याणासाठी समर्थन देणाऱ्या कारणांसाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे व सोलापूर येथे फॅमिली प्लॅनिगच्या शाखा आहेत.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेविषयी
सोलापूरात फॅमिली प्लॅनिगच्या शाखेची स्थापना सप्टेंबर १९७७ साली प्रसिध्द बालरोग तज्ञ, संस्थेचे माजी अध्यक्ष अश्विनी सहकारी रुग्णालयाचे कै. डॉ. उमाकांत वरेरकर, प्रसिध्द दंतरोग तज्ञ डॉ. भालचंद्र किणीकर, कै. अॅड. अरविंद नाडकर्णी, प्राचार्य कै. डॉ. के. एस. मार्डीकर व प्राचार्य कै. डॉ. के. भोगिशियन यांनी केली. सन २००२ पासून प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी संस्थेची धुरा सांभाळली. त्यांनी संस्थेचे कार्य विविध राजकीय, सामाजिक व देणगीदारांपर्यंत प्रभावीपणे मांडले. शाखेचे प्रधान कार्यालय परमेश्वर कोळी समाज मंदीर, दयानंद कॉलेज रोड, भवानी पेठ येथे असून पद्मावती क्लिनिक हा संस्थेचा दवाखाना रंगा चौक, बुधवार बाजार, जन्नत कॉम्प्लेक्स समोर आहे. प्रिसिजन फाऊंडेशन यांचा कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर.) निधीतून सर्वकष लैंगिकता शिक्षण हा प्रकल्प तर ल.गो. काकडे एज्युकेशनल फाउंडेशन यांचा बेसिक कॉम्युटर कोर्स हे प्रकल्प सुरु आहेत. स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी, १२ आठवडयापर्यंचे सुरक्षित गर्भपात आदींच्या शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन साधनांचे वाटप, गरोदर महिला व बालकांचे लसीकरण, कैन्सर जनजागृती व सेवा, एच.आय.व्ही. तपासणी, गुप्तरोग तपासणी व समुपदेशन, हेपॅटायटीस बी लसीकरण व समुपदेशन, लिगभेद आधारित हिंसाचार समुपदेशन व सेवा, महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, विविध जागतिक दिनानिमित्त जनजागरण दिडया, सायबर गुन्हयांविषयी जनजागृती केली जाते. प्रशासकीय विभाग, सुदूर सेवा विभाग, प्रजनन आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग, सर्वकष लैंगिकता शिक्षण प्रकल्प, बेसिक कॉम्प्युटर कोर्स या विविध विभागांमधून संस्थेचे काम सुरु आहे.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन
हयुमॅनीटेरियन प्रकल्पाविषयी
————–
सोलापूर दि१३-मिनिमम इनिशिअल पॅकेज ऑफ सर्विहसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राइटस MISP (Minimum Initial Service of Package for SRHR) यावर्षी हयुमॅनीटेरियन हा प्रकल्प सोलापूर शाखेला देण्यात आलेला आहे. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकल्प पूर्व तयारीचे काम करण्यात येणार आहे. अशी माहिती फॅमिली प्लॅनिंग चे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पाची व्याप्ती महाराष्ट्रभर असणार आहे. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी व आरोग्य सेवा देण्यासाठी पूर्व तयारी व प्रबोधन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, सोलापूर व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यालय यांच्यासोबत एफ.पी.ए.आय. काम करणार आहे. यासाठी सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळ, युवक मंडळ, आरोग्य क्षेत्रातील सामाजिक संस्था, शासकीय व निमशासकीय आरोग्ययंत्रणा, इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आदींबरोबर सामंजस्य करार करुन त्यांना प्रजनन आरोग्य व कुटुंब कल्याणच्या सेवांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे व यासाठी विविध संस्थांचे सहकार्य मिळणार आहे.
यासाठी किमान प्रारंभिक सेवा पॅकेज ही योजना तयार करण्यात आलेली असून त्यास मिनिमम इनिशिअल पॅकेज ऑफ सव्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राइटस MISP (Minimum Initial Service of Package for SRHR) असे संबोधण्यात आलेले आहे. या प्रकल्पांतर्गत MISP च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनावेळी पुढील सेवा दिल्या जाणार आहे.
१. कुटुंबनियोजन साधनांचे वाटप
२. सुरक्षित गर्भपात सेवा
३. लिंगभेद आधारित हिंसाचार समुपदेशन व सेवा
४. लैंगिक हिंसाचार प्रतिबंध
५. गुप्तरोग व एच.आय.व्ही. संदर्भातील सेवा
६. सामान्य आरोग्य तपासणी व औषधोपचार
७. विच्छेदन
८. नको असलेली गर्भधारणा, नवजात विकृती आणि माता बाल मृत्यु रोखणे
नैरामिक, मानवनिर्मित, जैविक आपत्तीमुळे जे परिणाम होतात त्यात रिखया व किशोरवयीन मुले-मुली अधिक प्रभावित व असुरक्षित होतात. आपत्तीमध्ये महिला, किशोरवयीन मुली, उपेक्षीत व दुर्लक्षित घटक (LGBTQIA) – लेस्बीयन, गे, बाय सेक्शुअल ट्रान्नाजेंडर, क्युअर, इंटरसेक्स व एसेक्युअल, गरोदर महिला व स्तनदा माता, वयोवृध्द, एच.आय.व्ही. सह जीवन जगणारी बालके, महिला, पुरुष, दिव्यांग हे घटक प्रभावित होतात. तसेच आपतकालीन परिस्थितीत महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार होतात. बालविवाह केले जातात, मानची तस्करी मोठ्या प्रमाणात होते तसेच असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण वाढण्याची भिती असते. गर्भधारणा व प्रसूती दरम्यान गुंतागुंतीचे प्रकार वाढतात. या सर्व समस्यांवर आरोग्यविषयक सेवा व समुपदेशन देण्याचे कार्य फैमिली पर्नेनिग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेकडून केले जाणार आहे. अशा पध्दतीच्या संकटकालीन परिस्थितीत लैंगिक व प्रजनन आरोग्यासाठी किमान प्रारंभिक सेवा पॅकेज अर्थात मिनिमम इनिशिअल पैकेज ऑफ राहिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अॅड राइटस (MISP) महत्वाची भूमिका बजावणार आहे.
हा प्रकल्प महिला आरोग्य केंद्रित असला तरी अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास पुरुषांनाही त्यावेळची गरज लक्षात घेऊन आरोग्यविषयक सेवा दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात प्रबोधनात्मक कार्य केले जाल आहेत. या पूर्वी फैमिली प्लॅनिंगच्या विविध शाखांच्यावतीने सन २०१८ मध्ये केरळामधील कोडूगू येथील महापूर, सन २०१९ मध्ये सायक्लोन फनी, सन २०२० मध्ये सायक्लोन अॅम्फान, सन २०२१ मध्ये कोरोना महामारी, सत २०२१-२२ मध्ये केरळामधील महापूर, सन २०२१-२२ मध्ये चेन्नईमधील महापूर, सन २०२३-२४ मध्ये मणीपूर दंगलीत सेवा देण्याचे काम प्रकल्पातून केले आहे. सध्या केरळमधील (तिरुअनंतपूरम) वायनाड येथील महापूर व भूस्खलन आपत्तीमध्ये प्रकल्पाचे काम सुरु आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन सोलापूर जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी, महसूल विभाग अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २१, २२ जून २०२४ रोजी या प्रकल्पांतर्गत युपीएचसी, पीएचसी, शासकीय व निमशासकीय आरोग्य संस्थाचे वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, अधिपरिचारीका, समुपदेशक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचेकरीता आपत्ती व्यवस्थापनात मिनिमम इनिशिअल पॅकेज ऑफ सव्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अॅड राइटस (MISP) याविषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराल ८० लोकांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षण शिबीरात सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी शक्तिसागर ढोले, सहाय्यक अधिकारी अर्चना विसोई ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सोमपा सोलापूरच्या डॉ. राखी माने, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, सोलापूरचे चेअरमन डॉ. राजीव प्रधान, प्रसिध्द खीरोग व प्रसूतीशख तज्ञ डॉ. मिलींद शहा, ए.आर.टी. विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर-चिटणीस, एफ.पी.ए.आय. सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, कार्यक्रम अधिकारी विरेंद्र परदेशी, सौ. अमरजा थिटे, अग्निशमन विभागाचे अच्युत दुधाळ आदीनी प्रशिक्षण दिले. दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी हयुमॅनीटेरियन दिनानिमित्त सोलापूर जिल्हयातील ग्रामपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी यांचेसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ व द. सोलापूर तालुक्यातील कमिटीच्या सदस्यांचा सहभाग होता. दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी पंढरपूर तालूक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील व ए.आर.टी. विभागातील वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, अधिपरिचारीका, समुपदेशक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचेकरीता आपत्ती व्यवस्थापनात मिनिमम इनिशिअल पॅकेज ऑफ सव्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राइटस (MISP) याविषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ३७ जणांनी सहभाग नोंदविला होता.
माहे सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पांतर्गत पत्रकार परिषद, अक्कलकोट तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, अधिपरिचारीका, समुपदेशक, आशावर्कर व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचेकरीता आपत्ती व्यवस्थापनात मिनिमम इनिशिअल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राइटस (MISP) याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर, जिल्हा परिषद आरोग्यविभाग, सिव्हील सर्जन, महानगरपालिका आरोग्य विभाग, डॉ. व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सोमपा अग्निशमन विभाग, कम्युनिटी सोशल ऑर्गनायझेशन्स यांचे प्रतिनिधीकरीता एक दिवसीय ऍडव्होकसी मिटींगचे आयोजन, मिस्प कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्याच सदस्यांकरीता सेक्शुअल जेंडर बेस्ड व्हायलंस व समुपदेशन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन, दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रिस्क रिडक्शन दिनानिमित्त विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकरीता चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन.बी.तेली, व्हाईस चेअरपर्सन प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, फायनान्स सदस्य डॉ. राजीव प्रधान, मार्गदर्शक प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर, माजी अध्यक्षा प्रा. डॉ. नभा काकडे, डॉ. गौरी कहाते, प्रा.विजया महाजन, डॉ. आग्रजा चिटणीस, अपेक्षा सावंत व शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांनी दिली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment