सारा न्यूज नेटवर्क -
श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना युवाशक्ति चौक सोलापूरचे उपाध्यक्ष आनंदराव कानडे यांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहात साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना युवाशक्ती चौक , सोलापूर या संघाचे उपाध्यक्ष श्री आनंदराव कानडे यांचा 79 वा वाढदिवस आज दावत चौक येथील हॉटेल शिवपार्वती येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन श्री समर्थ जेष्ठ नागरिक असोसिएशन कडून सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री नवनाथ कदम व प्रसिद्ध प्रमुख श्री शेखर देशमुख, फंड साहेब ,कोळेकर साहेब ,वराडे साहेब ,श्री व्यास ,श्री कलधोने, श्री चव्हाण सर, श्री जोशी ,श्री पाटील ,श्री जाधव ,श्री कसबे आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment