सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे, सरचिटणीसपदी सागर सुरवसे, खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड झाली.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड झाली. सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची फेरनिवड तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची निवड झाली. या कार्यकारिणीत 'सकाळ'चे बातमीदार तात्या लांडगे यांची चिटणीस, रामेश्वर विभूते यांची सहचिटणीस तर उपसंपादक श्रीनिवास दुध्याल यांची सदस्यपदी निवड झाली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या निवडीनंतर गुलाल उधळत ढोल, ताशाच्या गजरात जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अॅड. राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले. निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी अँड नरोटे, माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर, चंद्रशेखर कव्हेकर, प्रशांत जोशी यांच्या हस्ते सत्कार झाला.
कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी उमेश कदम, आफताब शेख, अजित उंब्रजकर, नितीन पात्रे, अजित संगवे, रतन (अप्पा) बनसोडे, चिटणीसपदी तात्या लांडगे, संगमेश जेऊरे, वेणूगोपाल गाडी, सहचिटणीसपदी अजित बिराजदार, रामेश्वर विभूते, सदस्यपदी श्रीनिवास दुध्याल, राजकुमार माने, विजय थोरात, राजकुमार वाघमारे, रणजित जोशी, विजयकुमार राजापुरे, विजय साळवे, सचिन जाधव, विकास कस्तुरे, संदीप येरवडे, डॉ. समीर इनामदार, सलमान पिरजादे, विरल गायकवाड, रोहन नंदाने, मनोज हुलसुरे, विश्वभूषण लिमये, व्यंकटेश दोंता, मुजम्मिल शहानुरकर, रोहन श्रीराम, सुदर्शन भालेराव, अमोल साळुंखे यांची निवड झाली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment