Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, September 28, 2024

जगतिक पर्यटन दिन "स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर" , येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम करून साजरा...

 


सारा न्यूज नेटवर्क

जगतिक पर्यटन दिन "स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर" , येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम करून साजरा...

सोलापूर (प्रतिनिधी) :- २७ सप्टेंबर, आध्यात्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आता पर्यटन शिक्षणाच्या बाबतीत समृद्ध होऊ लागला आहे. सरकारच्या पर्यटन विभागाने स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी हे राज्यातील पहिले पर्यटन शिक्षण केंद्र सुरू केले.

जागतिक पर्यटन दिन विशेष निमित्त या महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



प्रथम सकाळी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व केटरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कंबर तलाव परिसर ते कॉलेज पर्यंत स्वच्छता अभियान अंतर्गत साफसफाई करण्यात आली. 

तद्नंतर कॉलेज परिसरात विविध प्रकारचे झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्क यांचे सहकार्य लाभले. 


या कार्यक्रमाचे वेळी स्वामी समर्थ महाराष्ट्र केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य संदीप तपकीर व ऑफिस स्टॉप, मनोज गेडाम सर, पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर व सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, आरोही कॉम्प्युटर सोल्युशनचे संस्थापक आनंद पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी स्वच्छता निरीक्षक कार्तिक पवार, जमादार राज उबाळे व स्वच्छता विभाग संपूर्ण टीम, व गांधी व्हीजनचे सुभाष शास्त्री यांच्या उपस्थितीत आज येथे वृक्षारोपण करण्यात आले...

ह्या स्वच्छता व वृक्षारोपणच्या मोहिमेस श्री स्वामी समर्थ हॉटेल मॅनेजमेंट ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी येथील  विद्यार्थी व  विद्यार्थिनीचे सहभाग होता व  आदीची उपस्थिती होती... 

निसर्ग आहे तर आरोग्य आहे, 

आरोग्य आहे तर निसर्ग आहे 

चला सारे झाडे जगवूया.. 

झाडे लावा. झाडे जगवा.. 

पाणी आडवा. पाणी जिरवा.. 

हा संदेश देऊन घोषणा देण्यात आल्या. 


डॉ मनोज देवकर यांनी  विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व व माहिती समजावून सांगितली. सर्व भारतीयांची जबाबदारी आहे ,प्रत्येक जण आपल्या सोसायटीत, नगरात अपार्टमेंट वाड्या , वस्त्या, सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी ,अशा ठिकाणी सर्वांनी एक झाड लावावे. 

 एक पेड माॅऺ के नाम

 भारत माता की जय



यावेळी जागतिक पर्यटन दिन परिसंवाद, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण या विषयावर पर्यटन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. 

 प्राचार्य संदीप तपकीर यांनी कॉलेज बद्दल माहिती देताना सांगितले की, 

हे पर्यटन विभागाचे राज्यातील पहिले पर्यटन शिक्षण केंद्र सोलापुरात आहे. 

कॉलेज मधील विविध कोर्स, रोजगार निर्मितीच्या वाढत्या संधी,  

बारावीनंतरचे कोणकोणते कोर्स उपलब्ध..

याबद्दल माहिती सांगितली. 


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment