Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 12, 2024

गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा… पर्यावरणपूरक देखाव्यातून देवकर परिवाराने दिला संदेश…

 



सारा न्यूज नेटवर्क - 

गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा…

पर्यावरणपूरक देखाव्यातून देवकर परिवाराने दिला संदेश…

सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. ११ सप्टेंबर – आनंदाचा , उत्साहाचा आणि नवचैतन्याचा गौराईचा सण सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मंगळवार ( दी. १० ) सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता गौराईसह पिलवंडाचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. आकर्षक सजावट आणि विविध प्रकारच्या देखाव्यातून गौराई सजवली होती. दुपारी बारा वाजता पूजा आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सुवासिनी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला.

दरम्यान सुवासिनी महिलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गौराईचा देखावा भक्तांसाठी खुला करण्यात आला.



विजापूर रोड सैफुल येथील डॉ मनोज देवकर व महेश देवकर यांच्या परिवाराकडून पर्यावरणपूरक गौरी देखावा तयार करण्यात आला होता.


त्या ठिकाणी वडाच्या झाडाला वटसावित्रीची पुजा करत असलेल्या महिला हा देखावा करण्यात आला. 



तसेच शेतातील शेतकरी, बैल जोडी, बैलगाडी, गायवासरु असा ग्रामीण भागातील शेती विषयक देखावा करण्यात आला होता.



झाडे लावा.  झाडे जगवा..

घरटे लावा.. पक्षी वाचवा.. 

असा देखावा दाखवण्यासाठी पक्षाचे घरटे सर्वानी लावले पाहिजे हा संदेश देण्यासाठी पक्षाचे सुंदर असे घरटे ही ठेवण्यात आले होते.

हे घरटे खास करुन पुणे येथुन मागवले आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देवकर परिवाराने सांगितले.

हा पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी व गौराईचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने देवकर कुटुंबांच्या घरी येत होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment