सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगरपालिका आयोजित "माझी वसुंधरा अभियाना" अंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या "वसुंधरा संमेलन 2024" दिमाखदार सुरुवात..
26 व 27 सप्टेंबर दोन दिवस राहणार संमेलन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका आयोजित "माझी वसुंधरा" अंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या "वसुंधरा संमेलन 2024" चे आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने पार पडला.
वसुंधरा संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी वृक्षदिंडी हुतात्मा चौक येथून निघून महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीच्या प्रांगणात पोहोचली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सहभागी झालेल्या विविध शाळांच्या माध्यमातून पर्यावरण विषयक संदेश देणाऱ्या *लघुनाटिका* सादर करण्यात आल्या, उद्घाटन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती शितल तेली उगले मॅडम यांनी कार्यक्रमासाठी फित कापून वन महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
या वन महोत्सवामध्ये *सोलापूर जिल्ह्यातील जैवविविधता* दर्शवणारे प्रतिकृती तथा माहिती फलकांचे प्रदर्शन सोलापूर प्रादेशिक वनविभाग, इको नेचर क्लब, जी आय बी फाउंडेशन यांच्यावतीने प्रदर्शन भरवण्यात आले आहे,
त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभाग यांचे स्थानिक प्रजातीच्या रोपांचे प्रदर्शन भरवले आहे, सामाजिक वनीकरण चे अधिकारी सचीन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरले आहे.
सोलापूर शहर आणि परिसरातील विविध खाजगी नर्सरी चालकांद्वारे शोभिवंत रोपांची प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. पर्यावरण गतिविधि उपक्रम अंतर्गत जनजागरण करणारा साप शिडी चा खेळ देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे.
इको नेचर क्लबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या रोपांचे वाटप पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर व सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त तसेच महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच उद्यान विभागाचे अधीक्षक आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले असून. कार्यक्रमांमध्ये विविध विविध संस्था आणि शाळांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हे प्रदर्शन दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन समोरील लॉन मध्ये नागरिकांसाठी मोफत खुले ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे सोलापूर सेल्फी पॉईंट ठरत आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांनी I LOVE SOLAPUR या ठिकाणी आपले फोटो काढून समाज माध्यमांवर प्रसारित करावेत ही विनंती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment