सारा न्यूज नेटवर्क -
सोलापुरातील देवकर परिवाराचे पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सोलापूरातही लाडक्या बाप्पाचे विसर्जन जल्लोषात करण्यात आले. यावेळी अनेक भक्ताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर शहरातील विजापूर रोड सैफुल येथे राहणारे डॉ मनोज देवकर व महेश देवकर यांच्या निवासस्थानी इको फ्रेंडली गणपती ची स्थापना करण्यात आली होती.
यावर्षी देवकर कुटुंबीयानी श्री गणेश बाप्पास घरीच नव्या कुंडीत भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी येणारच हा निरोप घेऊन बाप्पा आशीर्वाद देऊन गेले.
वृक्ष पर्यावरण प्रेमी व संवर्धक असलेले डॉ मनोज देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रतिभा देवकर, महेश देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.ज्ञानेश्वरी देवकर यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.
यावेळी देवकर परिवारातील सौ.उज्वला देवकर, इंदुमती देवकर, निसर्ग देवकर, सृष्टी देवकर, अमृता देवकर, स्वराज भारत देवकर सौ.दिपा मेटे, सौ.निकीता झाडकर सर्व देवकर परिवार उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment