सारा न्यूज नेटवर्क -
विजापूर रोड जुळे सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाकडून वृक्षारोपण करण्यात आले..
सोलापूर (प्रतिनिधी) :- जर वर्षी प्रमाणे याही वर्षी विजापूर रोड व होटगी रोड सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होत आहे. या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळा मार्फत विविध उपक्रम राबविले जातात. जसे की सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर केअर हॉस्पिटल सैफुल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा उपक्रम इको नेचर क्लब मार्फत राबवला जात आहे.
इको नेचर क्लबच्या माध्यमातून प्रत्येक गणेश मंडळांना १० रोप देऊन सोलापूर शहर मध्ये जवळजवळ 5000 रोपांचा वृक्षारोपण सर्व गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे.
पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार, आयुक्तालयाचे गणेशोत्सव मुख्य समीक्षक डॉ मनोज देवकर, राम हुंडारे यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आहे.
त्या मध्ये विजापूर रोड राष्ट्रीय महामार्ग मध्ये असलेले दुभाजक यांच्या मध्ये झाडे लावण्यात आली.
विजापूर नाका ते सैफुल पर्यंत जवळपास 150 झाडे लावण्यात आली व ती सर्व झाडे जगवण्याची जबाबदारी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ घेणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणप्पा सतुबर सर यांनी बोलताना सांगितले. हा कार्यक्रम सोलापूर केअर हॉस्पिटल व लायन्स क्लब व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या त्रिवेणी संगमातून घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सोलापूर केअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ मल्लिकार्जुन तरनळ्ळी यांनी सांगितले की विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मधील सर्व मंडळांना भेटी देऊन DJ मुक्त मिरवणूक काढण्यात येणार आहे, लेझीम आणि भारतीय वाद्य याचा जास्तीत जास्त वापर करावा असे सर्व मंडळांना सांगण्यात आले आहे.असे सामाजिक उपक्रम व वृक्षारोपण हे गणेशोत्सव पुरते मर्यादित न ठेवता वर्षेभर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर केअर हॉस्पिटल सैफुल मध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. तेथे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणप्पा सतुबर सर, माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील, सोलापूर केअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ मल्लिकार्जुन तरनळ्ळी, संस्थापक सदस्य सुभाष चव्हाण, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर, माजी अध्यक्ष महेश देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांची उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment