Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, May 18, 2025

सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश(भाऊ)राठोड यांच्या वतीने भाजपा शहर अध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार.



सारा न्यूज नेटवर्क - 

 सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश(भाऊ)राठोड यांच्या वतीने भाजपा शहर अध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार.

सोलापूर (प्रतिनिधी) :- जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उद्देशाने जुळे सोलापुरातील इचगिरी मठ समोर कुबेर कॉम्प्लेक्स येथे जनतेची कामे मोफत निस्वार्थीपणे करण्यासाठी निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे श्री. प्रकाश भाऊ राठोड यांनी नव्याने सुरू केलेले असून तेथे नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले शासनाचे आधार कार्ड, मतदान कार्ड,पॅन कार्ड, रेशन कार्ड , मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, ईश्रम कार्ड, असे अनेक शासकीय योजनेचे कागदपत्रे नागरिकांना मोफत निस्वारथीपणे देण्यासाठी कार्यालय सुरू केले असून तेथे आतापर्यंत शेकडो लोकांनी लाभ घेतलेला आहे व सर्वसामान्य नागरिकांच्या भविष्यात सोलापूर महानगरपालिकेतील काही अडीअडचणी असतील तर ते प्राधान्याने सोडवण्यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आलेले असून अल्पावधीतच सदर कार्यालयात जुळे सोलापुरातील नागरिकांनी प्रतिसाद देत असून अनेक लाभ करून घेत आहेत व आपल्या समस्या दूर करून घेत आहेत.



सदर सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ राठोड निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे यांनी सोलापूर शहर भाजप अध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर यांना सदर कार्यालयात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती देऊन सत्कार करण्याबाबत विनंती केल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन काल दिनांक 17/5/2025 रोजी सायंकाळी सात वाजता सदर कार्यालयास भेट दिली त्यावेळी प्रथम सौ.ममता राठोड यांनी त्यांचे आदराने औक्षण करून कार्यालयात सन्मानाने स्वागत केले. 

प्रारंभी निवृत्त सहायक आयुक्त ठाणे श्री प्रकाश भाऊ राठोड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी निस्वार्थी मोफत आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. व नंतर शाल,श्रीफळ,बुके देऊन त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला व भविष्यात सर्व सामान्य नागरिकांसाठी आपण एक अभ्यासू नेतृत्व शहराला लाभलेल्या आहेत तसेच भारतात राज्यात भाजपची एक हाती सत्ता असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसाठी होईल त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे असी विनंती केल्यानंतर भाजपा शहर अध्यक्ष सौ. रोहिणीताई तडवळकर यांनी प्रकाश भाऊ राठोड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून व त्यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव याच्या जोरावर नागरिकांची कामे जलद गतीने होतील तसेच भविष्यात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच जनतेसाठी निस्वार्थीपणे मोफत सेवा फाउंडेशनच्या वतीने महत्त्वाची कामे करीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 

 तसेच प्रकाश भाऊ राठोड यांच्या महत्त्वाची मागणी असलेली प्रताप नगर येथे नव्याने स्मशानभूमीसाठी सर्वतोपरी प्राधान्याने मदत करण्याचे ठोस आश्वासन दिले.

यावेळी प्रभाग 26 च्या लोकप्रिय नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण, नगरसेविका सौ.संगीता जाधव, भाजपा महिला आघाडी चिटणीस सौ.संपदा जोशी,भाजपचे सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण, नेहरू राठोड, उमेश चव्हाण,राजेश चव्हाण, आकाश चव्हाण,तुकाराम राठोड, सागर राठोड,सुरज राठोड, समाजसेविका सौ.ममता राठोड, सुमित राठोड,सौ.रिंकू राठोड,पूजा राठोड यांची उपस्थिती होती.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment