Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 9, 2025

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीने " घेतली, आमदार सुभाष देशमुख यांची भेट....



सारा न्यूज नेटवर्क - 

 झोपडपट्टी पुनर्विकासासाठी "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीने " घेतली,

     आमदार सुभाष देशमुख यांची भेट....


 सोलापूर (प्रतिनिधी) :-  सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे., अशा मागणीचे निवेदन "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या" वतीने मा. आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना दिले आहे., तरी याची  शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येत आहे., त्या अंतर्गत सोलापूर शहर व दक्षिण सोलापूरचे सोलापूरचे आ. मा.श्री सुभाष बापू   देशमुख साहेब यांना समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली, शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन निवेदन देण्यात आले., मा. आमदार सुभाष  देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या" वतीने वरील विषयी दि. २६.०३.२०२५ रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.,  सोलापूर शहरात एकूण १७७ झोपडपट्ट्या वसाहती आहेत., या वसाहतीत राहणारे रहिवाशी हे अत्यंत गरीब, दारिद्र्य रेषेखालील, कामगार वर्गातील आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाही., कारण पोट भरणेच ही कठीण अवस्था  त्यांची झाली आहे. 


      "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या" वतीने गेल्या महिन्यापासून, सोलापूरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आले., या अभियानात अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत., त्यापैकी प्रमुख समस्या या आहेत १.अनियमित पाणीपुरवठा २.अंतर्गत रस्ते ३. चेंबर भरल्याने घराघरात पाणी जाणे ४.कचऱ्याचे संकलन न होणे  ५. घंटागाडी आठ दिवसातून एकदा येणे ६. दिवाबत्ती ७. नालासफाई ८. ड्रेनेज लाईन ९. उघडी गटारे १०.धोकादायक विजेच्या तारा काढणे बाबत ११. मैला मिश्रित पाणीपुरवठा बंद करणे बाबत. १२. अत्यंत गंभीर समस्या म्हणजे सार्वजनिक शौचालय पूर्णपणे अस्वच्छ व अत्यंत भयानक रूप धारण केलेले आहेत., या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे., ही अवस्था व दुर्गंधी नाहीशी झाल्यास सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना जीवनदान मिळणार आहे., म्हणून झोपडपट्टीच्या सर्व समस्या या सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारे आहेत.

   तरी माननीयांनी सोलापूरचे आमदार म्हणून वरील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन, झोपडपट्टी रहिवाशांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून "स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर" व सोलापूरचा विकास साधण्यासाठी सहकार्य करावे. असे नमूद करण्यात आले आहे. 

     विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी,राधिका मीठ्ठा, सविता दासरी ,पद्मा मॅकल, राणी दासरी,  विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा,गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment