Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 17, 2025

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे हस्ते १० वी च्या पुणे बोर्ड परीक्षामध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न..




सारा न्यूज नेटवर्क - 

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे हस्ते १० वी च्या पुणे बोर्ड परीक्षामध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- आज दिनांक १६/०५/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर व इंडियन मॉडेल स्कुल संचलित स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कुल मधील इयत्ता १० वी पुणे बोर्ड परीक्षामध्ये ९०.०० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करुन उत्तुंग यश संपादन केलेले एकुण २३ विद्यार्थ्यांचे मा. पोलीस आयुक्त, साो सोलापूर शहर यांचे हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील मिटींग हॉल मध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

आजच्या कार्यक्रमाचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर श्री. एम राज कुमार सरांनी इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थीचे त्यांचे उत्तुंग यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी च्या पुणे बोर्डात स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कुल मधील कु. यल्ला साई मोहन हा ९७.२० % गुण मिळवुन शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे, कु. शेख इरमसबा एम. हनिफ हि ९७.००% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकाली आहे तर कु. वाघमारे अंकिता रमेश हि ९६.८०% गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावली आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कुल कडून एकुण ९१ विद्यार्थी हे इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकुण २३ विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी ९०.०० % पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. इयत्ता १० वी च्या पुणे बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल १००% लागलेला आहे.


इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या आजच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर श्री. एम. राज कुमार, मा. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक, श्री उदयसिंह पाटील, पोलीस उप निरीक्षक, श्री. अशोक बाबर आणि आय.एम.एस. ग्रुप ऑफ स्कुल चे डायरेक्टर श्री अमोल जोशी व सौ. सायली जोशी मॅडम, शाळा समन्वयक सौ. ममता बसवंती मॅडम, स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कारंडे, उप-मुख्याध्यापिका सौ. बिस्मिल्ला नदाफ तसेच शाळेचे टिचींग व नॉन टिचींग स्टाफ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment