सारा न्यूज नेटवर्क -
सहाय्यक कामगार आयुक्त यांचा माहिती लपविण्याचा प्रयत्न..
पोलीस कारवाई करणार-विष्णू कारमपुरी (महाराज)
सोलापूर (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत, माहिती मागितली असता, मा. जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, यांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे जन माहिती अधिकार कायद्याचा भंग केले आहेत., म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करण्याचा इशारा साप्ताहिक गुरुरथम चे संपादक विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी दिला आहे.
सोलापूर मानवी जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांना अनेक वेळा , माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या नियमा खाली बांधकाम कामगार योजनेत, बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार म्हणून प्रमाणित करण्यासाठी प्रमाणपत्र दिलेल्या ठेकेदारांची माहिती मागितली असता, ती माहिती माहिती अधिकार कायद्याखाली देता येत नाही, असे उत्तर दिले गेले., तरीही दि.११.०४.२९२५ रोजी वरील माहिती मागणी केली असता, माहिती देण्यास टाळाटाळ करून, अखेर नाईलाजास्तव दि. ३०.०४.२०२५ रोजी मागितलेल्या माहितीचे पत्र दिले. त्यात वरील मागणी व्यक्तिगत स्वरूपाचे असल्यामुळे, कलम १ मधील ( त्र )अन्वये माहिती ही व्यापक लोक हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली दिसून येत नाही., तसेच कोणत्याही सार्वजनिक कामकाजाशी हितसंबंध नसल्याने, युक्त कलमान्वये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती देणे शक्य नाही., असे पत्र दिले. परंतु उपकलम (त्र)यामध्ये माहितीचा अधिकार याचा अर्थ जी माहिती कोणत्याही शासकीय प्राधिकरणाने धारण केलेली आहे., किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली मिळण्यायोग्य असलेल्या माहितीचा अधिकार असा होतो., असे असताना एका शासनमान्य पत्रकाराने मागितलेली माहिती न देणे म्हणजे जन माहिती अधिकाऱ्यांचा एक प्रकारचा गुन्हा आहे., आणि ती माहिती मिळविण्यास अर्जदार पूर्ण हक्कधारी आहे., म्हणून सदर माहिती मिळावी म्हणून विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील केले आहे., म्हणून याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment