सारा न्यूज नेटवर्क -
" पाणी म्हणजे जीवन "
इंगळगी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सध्या सोलापूर जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्या मध्ये पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळेच सर्व गावात पाण्याची कमतरता भासत आहे.
अति तीव्र उन्हामध्ये सोलापूरातील इंगळगी गावकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. पाण्याचा प्रश्न, टँकरद्वारे पाण्याची सोय करावी लागत आहे.
तालुक्याचे आमदार श्री सुभाष बापू देशमुख, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री रामप्पा चिवडशेट्टी सावकार, श्री राजशेखर आण्णा शिवदारे त्यांच्या प्रयत्नातून टॅंकर द्वारे पाण्याची सोय झाली आहे.
ग्रामसेवीका सौ.नरोळे मॅडम, सरपंच श्री विनोद बनसोडे, उपसरपंच सौ.गोदावरीताई प्रधान गुरव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे इंगळगी गावाला आजपासून टँकरद्वारे पाणी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment