सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगरपालिकेच्या मा. विरोधी पक्षनेत्या तथा बीजेपी शहर प्रमुख मा सौ. रोहिणी तडवळकर यांनी मा. सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशन अध्यक्ष श्री प्रकाश राठोड यांच्या कार्याला भेट देऊन शुभेच्छा दिले..
सोलापूर (प्रतिनिधी) :- "जनसेवा, हीच ईश्वर सेवा" यानुसार माजी.सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश राठोड यांनी कुबेर कॉम्प्लेक्स हिचगिरी मठ सोलापूर येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून या कार्यालयातून शेकडो नागरिकांना सेवा देण्याचे काम चालू आहे याच कार्यालयाला सोलापूर महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेते तथा नवनिर्वाचित बीजेपी शहर प्रमुख मा.सौ.रोहिणी तळवळकर यांनी भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यालयात चालणाऱ्या कामकाजांची पाहणी करून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, कामाची पद्धत, ऑनलाइन कामकाज, हे पाहून खुश झाल्या. असे काम सोलापूरच्या प्रत्येक वार्डात मध्ये सुरु करणार असल्याचे सांगितले.
लवकरच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त जुळे सोलापूर भागात सेवा फाउंडेशन मार्फत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सक्षमीकरण करूया असे आव्हान केले
राठोड साहेब यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळे बीजेपी पक्ष वाढीसाठी खूप मोठी मदत होईल तसेच सोलापूर महापालिका आणि वार्डाचा चांगल्या प्रकारे विकास होईल असे मत व्यक्त केले.
यावेळी सौ.राजश्री चव्हाण नगरसेविका प्रभाग - २६, सौ.संगीता जाधव नगरसेविका प्रभाग २६, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल चव्हाण, नेहरू राठोड, उमेश चव्हाण, राजेश चव्हाण, आकाश चव्हाण, तुकाराम राठोड, सागर राठोड, सूरज राठोड आणि समाजसेविका सौ.ममता राठोड, सौ.सुमित्रा राठोड, सौ.रिंकू राठोड तसेच पूजा राठोड यांची उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment