Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, May 13, 2025

पत्रकार अंबादास गज्जम "पत्रकार सुरक्षा समिती" चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार अंबादास गज्जम "पत्रकार सुरक्षा समिती" चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित.. 


सोलापूर (प्रतिनिधी) : - पत्रकार सुरक्षा समिती वतीने  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला असून  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना  राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यासह पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन उपोषण निवेदन व पत्र व्यवहार केला जात आहे.



 समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना  पत्रकार सुरक्षा समिती वतीने  दरवर्षी सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो  पत्रकार सुरक्षा समितीचा 2025 चा आदर्श पत्रकार म्हणून सोलापूर येथील अंबादास गज्जम यांना  पुरस्कार देण्यात आला. 

 पत्रकार अंबादास गज्जम यांनी समाजातील तळागाळांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडले वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या प्रश्नावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवला आहे. 


अंबादास गज्जम यांचा दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल घालून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


 या कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कदम, संजीव सदाफुले उच्च न्यायालय वकील मुंबई, मीनाक्षीताई पेठे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, प्रा डॉ अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर, रामचंद्र सरवदे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र, मिर्झागालिब मुजावर संपादक लोकप्रिय दैनिक तुफान क्रांती, आन्सर तांबोळी (बी एस) सोलापूर शहर अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती, डॉ. यु. एफ जानराव सेवानिवृत्त तथा प्रसिद्ध कुष्टरोग तज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment