Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, May 12, 2025

WAVES VFX चॅलेंज स्पर्धेत मॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट सोलापूरचा विद्यार्थी ठरला राष्ट्रीय पश्चिम विभाग उपविजेता पदाचा मानकरी..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

WAVES VFX चॅलेंज स्पर्धेत मॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट सोलापूरचा विद्यार्थी ठरला राष्ट्रीय पश्चिम विभाग उपविजेता पदाचा मानकरी.. 


 सोलापूर (प्रतिनिधी) :- वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲण्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ अर्थात ‘वेव्हज्’ परिषदेने आयोजित केलेल्या WAVES VFX स्पर्धेत सोलापूर मधील MAAC ॲनिमेशन इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी ओमकार कोरे याने कठोर परिश्रमाने, आणि नाविन्यपूर्णतेने राष्ट्रीय पश्चिम विभागात उपविजेता पदाचा मानकरी ठरत सोलापूरचे नाव देशपातळीवर लौकिक केलं आहे. नुकत्याच मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे  पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात  राष्ट्रीय पश्चिम विभागात उपविजेता पदाचा मानकरी  ठरलेल्या ओमकार कोरे याचा अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC)चे संचालक आर. के. चांद, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर WAVES VFX ही स्पर्धा देशपातळीवर आयोजित केली जाते. ओमकारने आपल्या कौशल्य आणि कर्तृत्वाच्या बळावर राष्ट्रीय पश्चिम विभागात उपविजेता पद पटकावत सोलापूरचे नाव रोशन केले आहे. या यशाबद्दल ओमकारचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. 


 *ओमकार कोरे (राष्ट्रीय पश्चिम विभाग उपविजेता) प्रतिक्रिया* :- सदर WAVES VFX चॅलेंज स्पर्धेसाठी एकूण 8 तास अवधी होता. या 8 तासात 30 सेकंदाचे आउटपुट काढून सबमिट करायचे होते. आउटपुट 8 तासात सबमिट करणे हे माझ्यासाठी सर्वात जिकरीचे होते. मात्र कौशल्य आणि जिकरीच्या बळावर हे शक्य झाले. या WAVES 2025 स्पर्धेदरम्यान चित्रपटसृष्टीतील अनेक नवीन गोष्टी अनुभवयास, शिकण्यास  मिळाल्या अशी प्रतिक्रिया उपविजेता ओमकार याने दिली.

या WAVES VFX चॅलेंज स्पर्धेसाठी मॅक ॲनिमेशन सोलापूर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रवीण लांडे, VFX तज्ञ मार्गदर्शिका अमृता मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment