सारा न्यूज नेटवर्क -
स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशन संचलित मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईची सुरूवात..
सोलापूर (प्रतिनिधी) :- अक्कलकोट रोड गांधीनगर नंबर सहा येथे स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशन संचलित मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोई ची सेवा सुरू करण्यात आली कै . सुशीला रामचंद्र माशाळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम म्हणून ही सेवा चालू करण्यात आली.
माजी महापौर महेश अण्णा कोठे तसेच स्थायी समितीचे माजी सभापती किरण भैया पवार यांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी म्हणून सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या मुख्य रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे या ठिकाणी येण्या जाणाऱ्या नागरिकांसाठी पीण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे पाणपोई सुरुवात करण्यात आली आहे .या पाणपोई चे उद्घाटन स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या शहर अध्यक्ष भाग्यश्री राठोड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थापिका किरण माशाळकर ,अर्चना माशाळकर, स्वाती खरवले, लिंगवा सोलापूरे, शहाबुद्दीन शेख, नुऱ्याबाई नदाफ, रशिदा शेख, शबाना शेख ,चंदाबाई उबाळे, शिवाजी कणसे ,फिरोज शेख, शकील शेख आदी उपस्थित होते शेवटी माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment