सारा न्यूज नेटवर्क -
क्राइम न्यूज : कंपनीच्या स्वच्छतागृहात महिलांना लपून पहात होता ;
पोलिसांनी घेतले ताब्यात..
पुणे(प्रतिनिधी) : - विमाननगर भागातील एका खासगी कंपनीतील महिलांच्या स्वच्छतागृहात लपून डोकावून पाहणाऱ्या एका सफाई कामगाराला तरुणीनी पकडून विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. अनिल दुकाळे (वय २५, रा. वडार वस्ती, मांजरी) असे या सफाई कामगाराचे नाव आहे. याबाबत खासगी कंपनीतील २३ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना खासगी कंपनीतील महिला वॉश रुममध्ये २६ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील एका खासगी कंपनीत फिर्यादी कामाला आहे. अनिल दुकाळे हा गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून सफाई कामगार म्हणून काम करतो. सफाई विषयक कामे करणार्या कंपनीकडून त्याला कंत्राटावर नेमण्यात आले आहे. ही तरुणी २६ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महिलांच्या वॉशरुममध्ये गेली होती. तेथील वॉशरुममध्ये अनिल दुकाळे हा लाईट बंद असलेल्या वॉशरुममध्ये लपून बसला होता. तरुणी वॉशरुममध्ये गेल्यानंतर तिने लाईट सुरु केले. फिर्यादी तरुणी असलेल्या लेडीज वॉशरुम कम्पार्टमेंटमध्ये दुकाळे डोकावून पाहत होता. या तरुणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. कंपनीतील कर्मचार्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करीत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment