Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, May 8, 2025

ग्रामपंचायत गुरववाडी कार्यालयात सरपंच सौ.लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा व रवी आप्पाशा कलबुर्गी यांचा सत्कार संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ग्रामपंचायत गुरववाडी कार्यालयात सरपंच सौ.लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली

 मासिक सभा व रवी आप्पाशा कलबुर्गी यांचा सत्कार संपन्न.. 

गुरववाडी (प्रतिनिधी) :- दिनांक ८.५.२०२५  रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व सौ.लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संपन्न करण्यात आली. या प्रसंगी गुरववाडीचे रहिवासी श्री आप्पाशा ईरणा कलबुर्गी, यांचे चिरंजीव रवी आप्पाशा कलबुर्गी यांची पुणे कारागृह येथे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल गुरववाडी ग्रामपंचायत तर्फे सरपंच सौ.लक्ष्मी माळपा पुजारी व गुरववाडी ग्रामस्थ तर्फे भव्य सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर रवी कलबुर्गी यांची आई वडिलांचे ही आभार मानून त्यांचाही सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी, गावचे विकासरत्न ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी सरपंच माळप्पा पुजारी माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष रविकिरण स्वामी, डेप्युटी सरपंच जगदेवी स्वामी, माजी डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी ,ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमनी, मल्लिकार्जुन इंगळगी ,सारिका ओंकारी, आशा वर्कर ,अश्विनी फुलारी,शिवानंद मणूरे, सिद्धाराम मुनाळे, आकाश देवरमनी, सिद्धाराम बबलाद, बसवराज फुलारी, श्रीधर हळखेड, सागर ओंकारी, ग्रामविकास अधिकारी के.जी. मकानदार साहेब, बहुसंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment