Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 17, 2025

श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे,१९ मे रोजी धरणे आंदोलन -- विष्णू कारमपुरी (महाराज)

 


सारा न्यूज नेटवर्क - 

श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे,१९ मे रोजी धरणे आंदोलन -- विष्णू कारमपुरी (महाराज)

 सोलापूर(प्रतिनिधी): -  श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे, मुली व महिलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी महिला परीक्षिकांना नेमण्यात यावे, या मागणीसाठी "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने"  १९ मे २०२५ सोमवार रोजी, दु.१२:०० वा. धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे., अशी माहिती समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी दिली आहे. 

          सोलापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील, श्री मार्कंडेय जलतरण तलाव असून, या जलतरण तलावात मुली मुले, विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवती व महिला हे पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यास येतात. परंतु या जलतरण तलावात मुली व महिलांना पुरुष प्रशिक्षक पोहण्याचे प्रशिक्षण देतात हे अत्यंत चुकीची व गंभीर बाब असून, मुली व महिलांसाठी महिला प्रशिक्षिकांची नेमणूक करावी., अशा मागणीचे निवेदन मा.आयुक्त महानगरपालिका, सोलापूर यांना देण्यात आले आहे.  त्याचाच एक भाग म्हणून दि.१९.०५.२०२५, सोमवार रोजी दु.१२:०० वा. मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने, धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. 

            तरी सर्व सोलापुरातील नागरिक बंधू-भगिनींना या आंदोलनात सामील व्हा, असे आवाहन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केले आहे. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे






No comments:

Post a Comment