सारा न्यूज नेटवर्क -
संजय गांधी निराधार योजना चे अनुदान तात्काळ जमा करा.
संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी.
सोलापूर(प्रतिनिधी) :- शहरातील विविध भागात राहत असलेले वयोवृद्ध निराधार विधवा दिव्यांग लाभार्थी हे संजय गांधी निराधार अनुदान न मिळाल्याने या योजने पासून गेल्या चार-पाच महिन्यापासून वंचित असून त्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन यांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आले.
केंद्र सरकार व राज्य शासन यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना राबविण्यात येते याचा फायदा वृद्ध निराधार दिव्यांग विधवा बेघर यांना होत असतो पण गेल्या चार-पाच महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून उदरनिर्वाह व औषधांचा खर्च कसा करावा या चिंतेत आहेत.
राज्य शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये अनुदान देण्यात येते राज्यातील अनेक लाडक्या बहिणी ह्या सक्षम आहेत अनुदानाची खरी गरज समाजातील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विधवा निराधार लोकांना आहे त्यामुळे प्राध्यान्याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात यावेत तसेच या योजना चे अनुदान खुपच कमी असून या अनुदानात महिन्याला किमान 3000 अशी वाढ करण्यात यावी कारण सध्याची महागाई बघता हे अनुदान खूपच अपुरे आहे
याबाबत प्रशासनाच्या वतीने शासन दरबारी अनुदानात वाढ करण्याबाबत पत्र व्यवहार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मीनलदास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा संपर्कप्रमुख छत्र गुण माने शहर उपाध्यक्ष सिद्धाराम सवय शहर संघटक शेखर कंटेकर जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर लखन पारसे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे आधी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment