सारा न्यूज नेटवर्क -
भावसार युथ फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- भावसार युथ फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रविवार दि.१८/०५/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता विणकर बाग साखर पेठ सोलापूर याठिकाणी पंचवटी पतसंस्थेचे संस्थापक श्री दिलीप दादा पतंगे व हिंगुलांबिका देवी देवालय पुरोहित श्री संजय दादा हंचाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यासमयी भावसार समाजाचे उपाध्यक्ष श्री साई क्षीरसागर पूर्व विभाग हिंगुलंबिका देवी देवालय अध्यक्ष विजय महिंद्रकर प्रभात आरती मंडळाचे अरुण उत्तरकर, दिगंबर खमितकर, भावसार व्हिजन चे विशाल खमितकर , आशिष जवळकर, आयकॉन कॉलेजचे संस्थापक श्री सत्यम दुधनकर तसेच नामवंत फोटोग्राफर श्री झिंगाडे,श्री प्रवीण महिंद्रकर हे उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सचिन दुधनकर मार्गदर्शक आनंद मुसळे बंटी बेळमकर प्रमोद चिंचुरे,रितेश क्षीरसागर, अमोल कटारे अमरीश पुकाळे शरद बोंडगे, सी ए गणेश झिंगाडे, संतोष पुकाळे,नितीन बोंडगे ओम खोकले योगेश अंबरकर, विकास माळवदकर, श्री कटारे, सुमित पिसे, रोहन बासुतकर यांनी परिश्रम घेतले.
या लाठीकाठी प्रशिक्षणासाठी रुद्रशक्ती गुरुकुलचे श्री योगीनाथजी फुलारी व प्रशिक्षक श्री विवेकजी मिस्किन यांचे सहकार्य लाभले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment