सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर एसआरपी कॅम्प येथे "कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे" उद्घाटन मा.सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाऊंडेशन अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले..
सोलापूर (प्रतिनिधी) :- असंसर्गजन्य व्याधींमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता,दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून माननीय आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांनी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे उद्घाटन केले. यांमध्ये प्रामुख्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग या तीन प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे. दिनांक 21 एप्रिल 2025 ते 26मे 2025 या कालावधीमध्ये ही कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहे.
ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज असून यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर व biopsy घेण्यासाठीची आवश्यक उपकरणे तसेच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी colposcope guided biopsy तसेच स्तन कर्करोग बायोप्सी साठी आवश्यक असलेले उपकरणे उपलब्ध आहेत.
या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश असा आहे की,खेड्यापाड्यांमध्ये, गावांमध्ये राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना या सुसज्ज व्हॅन द्वारे सेवा देण्यात यावी हा आहे.
सोलापूर शहरात दिनांक 17 मे 2025 रोजी ह्या VAN द्वारे SRPF सोरेगाव येथे SRPF जवान व त्यांच्या कुटुंबीयांची कर्करोग तपासणी करण्यात आली.
या VAN चे उद्घाटन मा. सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशन अध्यक्ष श्री प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सोरेगावचे श्री राजशेखर पाटील तसेच सैफुलचे समाजसेवक श्री अनिल चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, सोलापूर महानगरपालिका CPM डॉ. बोराडे,Epidemologist डॉ. वाळवेकर, स्त्रीरोग तज्ञ, दंतशल्यचिकित्सक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. ऐश्वर्या सातपुते, डॉ. यतनाळकर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माननीय राठोड साहेब यांनी शासनाच्या या कर्करोग तपासणी मोबाईल व्हॅन च्या प्रकल्पाचे कौतुक केले तसेच या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment