सारा न्यूज नेटवर्क -
पर्यावरण प्रेमी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार..
सोलापूर ( प्रतिनिधी ) :- पर्यावरण प्रेमी वृक्ष संगोपन वृक्ष लागवड पर्यावरण संतुलन वृक्षांची निगा राखणे त्याचबरोबर पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगणारे पर्यावरण प्रेमी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यावरण विषयावर चर्चा देखील करण्यात आली याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख धाराशिव जिल्हाध्यक्ष (महिला ) सारिका चुंगे जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहराध्यक्ष अन्सर तांबोळी (बी एस ) शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद हल्लाबोलचे संपादक शब्बीर शेख अजहर शेख सतीश गडकरी इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment