Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, May 1, 2025

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा...



सारा न्यूज नेटवर्क - 

      महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा... 


 सोलापूर (प्रतिनिधी) :-  ०१ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त, महाराष्ट्र कामगार सेना व "मी सोलापूर माजी सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या" वतीने, विविध कार्यक्रमाने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. 

               जागतिक कामगार दिनानिमित्त, महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे सकाळी ९:००  वाजता भगवा झेंडावंदन श्रीमती चंद्रकला बोगा या ज्येष्ठ मातेच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींना मिठाई वाटप करण्यात आली., त्यावेळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी व कामगारांना त्यांचा हक्क प्राप्त करण्यासाठी शहीद झालेल्या त्यागी महापुरुषांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली., आणि जागतिक कामगार दिन कामगारांचे व कामगार संघटनांचे संघर्ष करण्याचे सर्व कायदे व हक्क हिरावून घेण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार हे जन सुरक्षा कायदे अंतर्गत करत आहेत., हे अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब आहे., म्हणून कामगारांनी या जनसंरक्षण कायद्याची पूर्ण माहिती सर्वसामान्य जनसमुदायांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करणे, हाच एक पर्याय आहे., म्हणून जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा देताना, केंद्रातील मोदी सरकारचा मात्र निषेध नोंदविला., शेवटी सर्व कामगार बंधू भगिनी व सोलापूरकर वासियांना शुभेच्छा दिल्या., सदर प्रसंगी श्रीनिवास बोगा, अक्षय नंदाल, प्रभू श्रीराम, विठ्ठल श्रीराम, सुमित भांडेकर, लक्ष्मीकांत कोडम, शाम नंदाल, गोपी नंदाल, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, राणी दासरी, सविता दासरी, शुभांगी वड्डेपल्ली शरणाप्पा जगले यांची उपस्थिती होती 

 सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment