सारा न्यूज नेटवर्क -
क्राइम न्यूज : अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेवर बिबवेवाडी पोलिसांची धाड;
५० लिटर हातभट्टी दारू नष्ट..
पुणे ( प्रतिनिधी ) :- पोलीस गस्त करीत असताना अचानक एका महिला अवैध दारूचा धंदा करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तिच्या अवैध दारू धंद्यावर धाड टाकून ५० लिटर दारू नष्ट करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ४/५/२०२५ रोजी गस्त दरम्यान नाज पान शॉपच्या, पाठीमागील बाजूस, गंगाधर रोड, बिबवेवाडी, पुणे येथे अवैध दारूचा धंदा करणारी एक महिला यांच्यावरती दारूची रेड करण्यात आली असून, ५०००/- रुपये किं. ची ५० लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. तसा सविस्तर पंचनामाही करण्यात आला आहे. सदर महिला आरोपी नामे संगीता अविनाश नानावत, वय ३५ वर्षे हिस महिला पोलिसा समक्ष ताब्यात घेण्यात आले असून, पुढील गुन्हा तपास करण्यात येत आहे अशी माहिती बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी दिली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment