Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, August 17, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



"विकसित भारत घडवण्यात Gen-Z चा सिंहाचा वाटा" - प्रकाश राठोड

स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये ध्वजारोहण व विद्यार्थ्यांशी संवाद.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त  सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये ध्वजारोहण, झेंडा रॅली, कवायत आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.


यावेळी *श्री. प्रकाशभाऊ राठोड, मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी* यांनी अनेक शाळांना सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


*ज्ञान प्रबोधन शाळा, माशाळ नगर*

ज्ञान प्रबोधन शाळा, माशाळ नगर येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्री. प्रकाश राठोड यांच्या शुभहस्ते पार पडला. संस्थेचे अध्यक्ष *श्री. सतीशकुमार दरेकर* आणि मुख्याध्यापिका *सौ. छाया कोळेकर* यावेळी उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राठोड म्हणाले,  

*"जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रामाणिक अभ्यास असेल तर ज्ञान प्रबोधन शाळेचा विद्यार्थी उद्या नक्कीच कलेक्टर, डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन देशाचे नाव उजळवेल. तुमच्यात ती क्षमता आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वप्न मोठी बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी आजपासूनच मेहनत सुरू करा."*





*जि.प. शाळा, प्रतापनगर तांडा*

प्रतापनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत बोलताना ते म्हणाले,  

*"2047 पर्यंत भारत 'विकसित भारत' होणार आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात सर्वात मोठा वाटा आपल्या Gen-Z चा म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांचा असेल. तुम्हीच देशाचे भविष्य आहात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा, मोबाईलपेक्षा पुस्तकाला, रील्सपेक्षा ज्ञानाला प्राधान्य द्या. शिक्षण हेच तुमचे खरे शस्त्र आहे आणि देशसेवा हेच तुमचे ध्येय असावे."*


यावेळी *सौ. शैला राठोड, निरीक्षक ठाणे* यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, *"गरिबी हे शिक्षणापासून दूर राहण्याचे कारण नाही. शिक्षण घ्या, प्रगती करा आणि स्वतःसोबत कुटुंबाचे आणि देशाचेही नाव मोठे करा."*


सालाबादप्रमाणे यावर्षीही *गोरपीठ, प्रतापनगर तांडा* येथे श्री प्रकाश राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमांना *श्री. सुरेश पवार, सेवानिवृत्त अधिकारी, समाजसेवक श्री. नेहरू राठोड, संतोष जाधव, रणजीत राठोड, सुरज राठोड, विनोद राठोड, ममता राठोड, तुकाराम राठोड, उमेश चव्हाण* यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment