Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, August 10, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पी. एस्. इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेजच्या सान्वी वाळवेकरला द्वितीय क्रमांक..

सोलापूर : - येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुल (विडी घरकुल विभाग, सोलापूर) आयोजित शिक्षणमहर्षी स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आज शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी 'मातोश्री गंगूबाई केकडे ज्युनिअर कॉलेज' येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

या स्पर्धेत पी. एस्. इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेज  सोलापूर येथील १२ वी कॉमर्समधील विद्यार्थिनी कु. सान्वी बिपीन वाळवेकर हिने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये वक्तृत्वासाठी विविध विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी सान्वीने 'मानवी जीवन बदलणारी कृत्रिम बुद्धिमत्ता' हा विषय निवडून अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. 


तिच्या या उत्कृष्ट वक्तृत्वाची दखल घेत परीक्षकांनी तिची द्वितीय क्रमांकाच्या रुपये ११०१/- आणि स्मृतीचिन्ह या पारितोषिकासाठी निवड केली. 

या स्पर्धेचा मुख्य पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 सान्वीने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशामुळे श्राविका  शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री.यतीन शहा,संस्थेच्या सीईओ देवई शहा, वरिष्ठ दिप्ती शहा,  ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. विलास लेंगरे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी तिच्या या यशाचे कौतुक केले.  तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




No comments:

Post a Comment