Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, August 16, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



नॅब डेफब्लाईंड प्रोजेक्ट सोलापूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


सोलापूर : - नॅब डेफब्लाईंड प्रोजेक्ट, सोलापूर यांच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देत देशभक्तीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. अशोक जाधव सर, उद्योगपती, सोलापूर हे उपस्थित होते. तसेच नॅब सोलापूरचे आजीव सभासद श्री. वाबळेश म्हेत्रे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास नॅब डेफब्लाईंड प्रोजेक्टचे विभाग समन्वयक श्री. विशाल शिंदे सर हे देखील उपस्थित होते.


स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नॅब डेफब्लाईंड प्रोजेक्टमधील बहुविकलांग मुले, त्यांचे पालक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष मुलांनी उत्साहाने सहभाग घेत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला.



यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विशेष मुलांना शिक्षण, सन्मान, समान संधी आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे नेण्यासाठी नॅब डेफब्लाईंड प्रोजेक्ट करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.


कार्यक्रमामुळे बहुविकलांग मुले व त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘समावेशक समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे’, असा सकारात्मक संदेश या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून देण्यात आला.





No comments:

Post a Comment