सारा न्यूज नेटवर्क -
घरकुल प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक..!
9 ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा धरणे आंदोलन
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
सोलापूर (प्रतिनिधी ):- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात रहात असून अल्प मानधन व तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक १८/६/२०२५ निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजना बाबत निवेदन सादर करण्यात आले होते.
सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकी हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना बाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत पुढील कार्यवाही साठी मा. संचालक ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले होते परंतु अद्याप मा संचालक ग्रामीण गृहनिर्माण विभागाने पत्रकार सुरक्षा समितीच्या घरकुल बाबत दिलेल्या निवेदना बाबत योग्य ती कार्यवाही न केल्याने राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनी पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment