Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, August 15, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



श्री वसंतराव नाईक हायस्कूल व समता मराठी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

सोलापूर, दि. १५ ऑगस्ट २०२६ : - भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन श्री वसंतराव नाईक हायस्कूल व समता मराठी विद्यालय, सोलापूर येथे देशभक्तीपूर्ण, उत्साही व आनंददायी वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.


स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर जिल्हा लोधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गुलजारसिंग शिवसिंगवाले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक चव्हाण सर होते. पर्यवेक्षक श्री. युवराज पारधे सर, शिक्षणतज्ञ श्री. सुभाष हीरशेट्टी गुरुजी, श्री. रोहितजी व्हटकर साहेब तसेच पालक प्रतिनिधी श्री. अब्दुल करीम खैरदी यांची प्रमुख उपस्थिती होती.


उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री. संजयकुमार शिवशरण सर यांनी ओजस्वी व अभ्यासपूर्ण शब्दांत केले.




यावेळी प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर मनोगते व्यक्त करून स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. समता मराठी विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ. मीनाक्षी संजय राठोड मॅडम यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग व योगदानावर प्रभावीपणे प्रकाश टाकला.


प्रमुख पाहुणे श्री. गुलजारसिंग शिवसिंगवाले यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका आणि सामाजिक एकात्मतेची गरज याविषयी मार्गदर्शन केले.


अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री. कार्तिक चव्हाण सर यांनी विकसित, आत्मनिर्भर व बलशाली भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने देशाप्रती कर्तव्यनिष्ठा, देशभक्ती, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त, संस्कार व सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून राष्ट्राच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. एस. पी. कदम सर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पालकांचे, शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे सौ. एस. ए. थिटे मॅडम यांनी आभार मानले.


देशभक्तीचा जागर, राष्ट्रनिर्मितीचा संकल्प आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.




No comments:

Post a Comment