सारा न्यूज नेटवर्क
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथे दि.३१ ऑगस्ट,२०२३रोजी रक्षाबंधनाचा भव्य कार्यक्रम गुरववाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. विशेषतः गुरववाडीचे विकासरत्न तथा माजी सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा भव्य नागरी सत्कारही गुरववाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.हा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्याचे कारण असे की,गुरववाडी गावच्या विकासासाठी म्हाळप्पा पुजारी यांनी अहोरात्रं-दिवस गाव विकास कामासंदर्भात प्रशासकीय स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून गाव विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून घेतला व गावात विविध सोयी सुधांसाठी हा निधी खर्च केला.उदा गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ते,गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटार,तसेच गावात गुरव समाज बांधवाची संख्या मोठ्या प्रमाणात असून आजतागायत तब्बल ४२ वर्षे उलटूनही गावाला म्हणावी तशी स्मशानभूमी नव्हती त्याची सोय उपलब्ध करून दिली. तसेच गावातील जिल्हा परिषद मराठी व कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली.अशी अनेक गाव विकास कामे म्हाळप्पा पुजारी यांनी केलेली आहेत.एक आदर्श ग्रामपंचायत कार्यलय कसे असावे याकडे आज सबंध तालुक्याचे लक्ष लागून आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करणयात आला.त्यानिमित्ताने गुरववाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करणयात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूर तालुका मार्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुवर्णा(ताई)झाडे-खेलबुडे,उत्तर सोलापूर मार्डी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश विंचूरे सर,गुरववाडी ग्रामसेवक के.जी.मकानदार,तलाठी राहुल बिरादार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा(ताई) झाडे यांनी म्हाळप्पा पुजारी यांच्या समवेत उपस्थित गुरववाडी पंचक्रोशातील ग्रामस्थ व इतर बांधवाना राखी बांधली.
तद्नंतर उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्याचा श्रीफळ,शाल,पुष्पगुच्छ व फेटा बांधून गुरववाडी ग्रामपंचायतीच्या वतीने व म्हाळप्पा पुजारी परिववराच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमच्या प्रमुख अध्यक्ष सुवर्णाताई(झाडे) यानीही सहकुटुंब सहपरिवार म्हाळप्पा पुजारी यांचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी गुरववाडी गावच्या विकास कामासंदर्भात व म्हाळाप्पा पुजारी यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी माजी मुख्याध्यापक प्रकाश विंचुरे सर म्हणाले की,पुजारी घराण्याची ही तिसरी पिढी सरपंचदी कार्यरत असून गुरववाडी गावचे प्रथम सरपंच कै.चिनप्पा पुजारी यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून महाळप्पा पुजारी यांनी त्यांच्या घराण्याचा वारसा जपला आहे. तसेच याप्रसंगी बोलताना सुवर्णाताई झाडे म्हणाल्या की, माळप्पा पुजारी यांनी जो गाव विकासाचा ध्यास घेतला होता तो पूर्ण केलेला असून गावातील आणखीन काही उर्वरित कामे करण्यासाठी माझी कसल्याही प्रकारची मदत लागल्यास मी त्यांना प्रशासकीय स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून मदत करण्याचे अभिवचन देते.
याप्रसंगी माळाप्पा पुजारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझ्या गुरववाडी या छोट्याशा गावाला सुवर्णाताई झाडे यांचे पाऊल लागले मी धन्य धन्य पावलो व एवढ्यावरच न थांबता मी गुरववाडी गावच्या विकासासाठी अहो-रात्रंदिवस प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करेन व सबंध जिल्हा व महाराष्ट्र राज्यभर माझ्या गावचे नाव लौकिक करेन.सदरच्या या कार्यक्रमाप्रसंगी गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसभेत नूतन तंटामुक्त अध्यक्ष पदी रविकिरण स्वामी व उपाध्यक्ष पदी विजय मोती यांची गुरववाडीच्या महिला सरपंच सौ. लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच तुकाराम विंचुरे,रविकिरण स्वामी,माजी उपसरपंच कल्याण रावजी,डॉ.काशिनाथ मुतगी, गुरववाडीचे ग्रामसेवक के.जी.मकानदार,अर्जुन बहादुरे, श्रीमंत सावळी,श्रीमंत पुजारी, बेगेश मोती,खाजाप्पा पुजारी,गुरववाडी जि.प. कन्नड व मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव चव्हाण सर,राजू चौगुले सर, शिक्षक गंगोडा सर,होटकर मॅडम,अंगणवाडी शिक्षिका अंबाबाई फुलारी, निलाबाई मुंडेवाडी,आशा वर्कर अश्विनी फुलारी,मदतनीस शरणाव्वा बबलाद,लक्ष्मी लोणी सुखदेवी बहादुरे,अनिता मोती,नागम्मा माशाळे,भिमवा पुजारी,सरुबाई सावळी,महानंदा पुजारी,मैंदर्गी गावचे शिलवंती निंबाळ व त्यांचे सर्व महिला मंडळ,संगप्पाआलूरे,विजय मोती. ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी, गुरुशांत सावळी आदींसह गुरववाडी ग्रामस्थ व पंचक्रोशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment