Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, December 1, 2023

चालत्या बस मध्ये एसटी ड्रायव्हरला हार्ट अ‍ॅटॅक,


मृत्यूपूर्वी त्याने वाचवले २० प्रवाशांचे प्राण. 

हिंगोली(प्रतिनिधी) : - बस चालू असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. परंतु अशाही परिस्थितीत चालकाने स्वतःला सावरत अगोदर बस सुरक्षित कडेला उभी केली आणि स्टिरिंगवरच प्राण सोडला. आपला प्राण जाण्यापूर्वी त्याने बसमधील १५ ते २० प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत लालपरीला अखेरचा निरोप दिला. 

बस थांबल्या नंतर काही क्षणात मारुती यांनी एसटीच्या स्टेअरिंगवरच प्राण सोडले. मारुती नेमाने यांच्या मृत्यूमुळे प्रवाशांसह बसस्थानकातील सहकाऱ्यांना देखील अश्रू अनावर झाले. 

ही घटना सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. मारोती हनुमंत नेमाणे (वय ५४, रा. संतुक पिंपरी) असे मयत चालकाचे नाव आहे.

मयत चालक नेमाणे हे गेली २४ वर्षे सेवेत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे.

 हिंगोली आगाराचे चालक मारोती नेमाणे व वाहक रेखा चांदणे हे सकाळी ६ वाजता बस घेऊन हिंगोली ते धानोरा फेरीसाठी गेले होते. शालेय विद्यार्थिनींना घेऊन त्यांना शाळेत पोहोचविले. त्यानंतर धानोराहून ते हिंगोलीकडे निघाले. बसमध्ये १ ते २० प्रवासी होते.

 रिधोरा पाटी जवळ बस आली असता चालक नेमाणे यांना अचानक छातीत त्रास सुरू झाला. काही कळण्याच्या आतच त्रास वाढला. परंतु स्वतःला सावरत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केली. त्यानंतर त्यांनी बसच्या स्टिअरिंगवरच डोके ठेवले आणि जागीच प्राण सोडला.


यावेळी वाहक रेखा चांदणे यांनी प्रवाशांच्या मदतीने चालक नेमाणे यांना तत्काळ हिंगोली येथील एका खासगी रुग्णालयात आणले. परंतु या ठिकाणी डॉक्टरांनी मारोती नेमाणे यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती कळताच हिंगोली आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम.शेख यांनी रुग्णालयात धाव घेतली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment