Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, August 17, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 


विंचूर येथील ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते बळीराम साबळे यांचे निधन


विंचूर :- येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले बळीराम लक्ष्मण साबळे उर्फ बळीभाऊ (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने आज सोमवारी सायंकाळी निधन झाले.


बळीभाऊ साबळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले होते. स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड स्वभावामुळे ते परिसरात सर्वांना परिचित होते.


त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.



त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता विंचूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


त्यांच्या निधनाने विंचूर परिसरातील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असून, सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment