१ फेब्रुवारी २०२३:
पुणे (वडगाव बु.) :येथे संत रोहिदास विकास फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा "समाजरत्न पुरस्कार" सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सारा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक व पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष श्री राम हुंडारे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वडगाव बु. पुणे येथील समारंभात मोठ्या उत्साहात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. सुरेखाताई दिघे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्षा - सौ. सुरेखाताई दिघे, महाराष्ट्र राज्य सचिव श्रे. देवप्पा शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य महिला सचिव सौ. रुपालीताई टिके, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ, श्री. संजू भटकर साहेब, महाराष्ट्र राज्य सहसल्लागार श्री. राजेश नांदवीकर साहेब, निवड कमिटी प्रमुख श्री. अर्जुन धुमाळे साहेब, महाराष्ट्र राज्य खजिनदार श्री. निवृत्ती दिघे साहेब यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment