सोलापूर (प्रतिनिधी) :महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सोलापूर विकास मंचची पुराव्यानिशी तक्रार दाखल_
जिवघेण्या प्रदुषणकारी काजळीमुळे सोलापूरकरांच्या आरोग्यास अत्यंत धोकादायक अशी स्थिती निर्माण झाली असून येणाऱ्या काळात भोपळ गॅस दुर्घटनेपेक्षा अत्यंत भयंकर घटना सोलापूरात घडण्याची वाट न पाहता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर उपप्रादेशिक अधिकारी श्री निखिल मोरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. गेल्या १५ वर्षांपासून जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांना प्रती दिन ४० सिगरेट इतक्या धोकादायक रासायनिक काळजीयुक्त प्राणवायुमुळे फुप्फुसांचे आजार, दुषित पाण्यामुळे किडणीचे विकार तथा कॅन्सर अश्या भयंकर रोगराईचे भोग बालकांनसहित प्रौढ नागरिकांना सोसायला लागत आहेत.
सोलापूरकरांच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्रदुषणकारी आणि घातक काजळी विरोधात अॉनलाईन सर्व्हे विकास मंच तर्फे घेण्यात आला, त्यास सोलापूरकरांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत काजळीमुळे होणार्या दुष्परिणामांवर आतापर्यत ४२४ जणांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. जीवघेणी आणि प्रदुषणकारी काजळीचे सॅम्पलसहित दस्तऐवज सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले. सदर पुराव्यांचा अभ्यास करुन प्रदुषण करणार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली.
मागील तीन महिन्यांपासून जुळे सोलापूरकर कोरडा खोकला, सर्दी आणि खोकल्याने हैराण असुन महानगरपालिका आरोग्य केंद्र तथा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये खोकल्याच्या औषधांची प्रचंड मागणी होत आहे, काही दिवसांपूर्वी तर ह्या औषधांचा देखील तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. जीवघेणी काजळी श्वासाद्वारे फुफ्फुसात पोहोचतात नंतर रक्तातात मिसळून शरिराच्या सगळ्या अवयवां मध्ये पोहचुन दिर्घकाळ राहुन अवयव निकामी करतात हे अभ्यासाअंती सिध्द झाले आहे. प्रदुषणारी आणि जीवघेण्या काजळी पासुन सोलापूरकरांची सुटका करावी तसेच रस्त्याच्या कडेला रेल्वे रुळा लगत मळी ची दुर्गंधी रेल्वे प्रवाश्यांना व रस्त्या वरील लोकांना नाक बंद करून जावे लागते, अश्या कैफियतपर तक्रार सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर उपप्रादेशिक अधिकारी श्री निखिल मोरे यांच्या कडे केली. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment