.
सोलापूर (प्रतिनिधी) : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (चित्रकला) एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत क्रमांक पटकाविण्याचा मान श्री पंचाक्षरी प्रशाला माळकवठेची विद्यार्थीनी कु. रोहिणी कन्नप्पा कोठे हिने मिळविला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील केंद्र क्रमांक:109048 माळकवठे केंद्रातून परीक्षेस बसली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून 4,81,367 विद्यार्थी बसले होते.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेच्या चारही विषयात मिळून महाराष्ट्र राज्यात 91 वा क्रमांक पटकाऊन यश संपादन केली आहे.या यशस्वी विद्यार्थिनीस प्रशालेतील कलाप्रिय कलाशिक्षक मा.श्री. सिद्धाराम काळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रशाला व गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. रोहिणी कोठे व मार्गदर्शन करणारे श्री सिद्धाराम काळे सर यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री.ष.ब्र.पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी (बृहन्मठ माळकवठे), मा.श्री. पद्मना चौखंडे सर (प्राचार्य), सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावकरी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
No comments:
Post a Comment