सारा न्युज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी) : डी.एस.टी.एस.मंडळ संचलित, युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वि. वा. शिरवाडकरांचा जन्म दिवस म्हणजे मराठी दिवस साजरा करण्यात आला. मराठी दिना निमित्त स्कूलमध्ये, मराठी राज्य गीत, भारूडे कविता, स्त्रोत, नाटयछटा सादर करण्यात आल्या होत्या. विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांनी “माझी माय सरस्वती हया गाण्यावर नृत्यसादर केले, तसेच वऱ्हाड निघाले लंडनला, याचा एकपात्री अभिनय सादर करण्यात आला. तसेच पहिला मराठी चित्रपट राज हरिषचंद्र या मूकचित्रपटातील सादर केलेले, लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर उत्कृष्ट सादरी करण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा बाजपेयी मॅडम या ही होत्या.
या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री. राजशेखर शिवदारे सरांनी केले, सदस्या डॉ.सौ. शुभदा उपासे मॅडम, मराठी दिना च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा बाजपेयी मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. पुजारी मॅडम यांनी व आभार सौ. वैशाली महाबोले, यांनी मानले तसेच या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ मानसी झलकीकर व स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment